तवशाचा गोड धोंडास कधी खाल्लाय? कोकणातील ही पारंपरिक रेसिपी नक्की करून पाहा

काकडीची कोशिंबीर तर खाल्ली असेल, पण पिकलेल्या काकडीपासून म्हणजेच तवशापासून बनणारा गोड धोंडास कधी चाखलाय? जाणून घ्या कोकणातील पारंपरिक तवशाचा धोंडास रेसिपी.
तवशाचा गोड धोंडास कधी खाल्लाय? कोकणातील ही पारंपरिक रेसिपी नक्की करून पाहा
तवशाचा गोड धोंडास कधी खाल्लाय? कोकणातील ही पारंपरिक रेसिपी नक्की करून पाहा'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on: 

काकडी म्हटलं की आठवते ती काकडीची कोशिंबीर. पण कोकणात याच काकडीपासून एक खास गोड पदार्थ केला जातो. जास्त पिकलेल्या काकडीला ‘तवसा’ म्हणतात आणि याच तवशाचा गोड धोंडास केला जातो. गूळ, खोबरं आणि वेलची घालून तयार केलेला हा पारंपरिक पदार्थ चवीला मऊ, गोड आणि स्वादिष्ट लागतो. तवशाचा धोंडास कसा बनवायचा, जाणून घेऊया.

साहित्य

  • पिकलेला तवसा

  • तांदूळ

  • गूळ

  • किसलेलं खोबरं

  • वेलची पूड

  • चिमूटभर मीठ

  • पाणी

  • तूप किंवा तेल

तवशाचा गोड धोंडास कधी खाल्लाय? कोकणातील ही पारंपरिक रेसिपी नक्की करून पाहा
नारळाच्या पाण्यातले पोहे खाल्ले आहेत का? झटपट करा ही खास कोकणी रेसिपी
तवशाचा गोड धोंडास कधी खाल्लाय? कोकणातील ही पारंपरिक रेसिपी नक्की करून पाहा
तोंडात टाकताच विरघळेल अशी दुधीची बर्फी; मुलांनाही आवडेल ही सोपी रेसिपी

कृती

तवसा आणि तांदूळ वाटून घ्या

तांदूळ स्वच्छ धुऊन काही वेळ पाण्यात भिजत ठेवा. तवसा स्वच्छ करून त्याचे तुकडे करा. तवसा खूप पिकलेला आणि बिया मोठ्या असतील, तर साल आणि बिया काढून घ्या.

मिक्सरमध्ये तवशाचे तुकडे, भिजवलेला तांदूळ, गूळ आणि किसलेलं खोबरं घाला. हे मिश्रण बारीक वाटून घ्या. गरजेनुसार थोडं पाणी घाला. मिश्रण फार पातळ करू नका.

वेलची आणि मीठ घाला

वाटलेल्या मिश्रणात वेलची पूड आणि चिमूटभर मीठ घाला. सगळं व्यवस्थित एकत्र करून घ्या. धोंडासासाठी मिश्रण मध्यम घट्ट असणं महत्त्वाचं आहे.

कुकरमध्ये शिजवा

ज्या भांड्यात धोंडास शिजवणार आहात, त्याला आतून थोडं तूप किंवा तेल लावा. त्यात तयार मिश्रण ओता.

तवशाचा गोड धोंडास कधी खाल्लाय? कोकणातील ही पारंपरिक रेसिपी नक्की करून पाहा
गोड खायचंय पण कॅलरी वाढण्याची भीती? चिंता सोडा अन् झटपट बनवा पौष्टिक चणा-मखाणा बर्फी
तवशाचा गोड धोंडास कधी खाल्लाय? कोकणातील ही पारंपरिक रेसिपी नक्की करून पाहा
हॉटेलसारखा पांढराशुभ्र अन् मऊ रवा ढोकळा! बनवा फक्त १० मिनिटांत, पाहा सिक्रेट रेसिपी

कुकरमध्ये थोडं पाणी घालून त्यात हे भांडं ठेवा. झाकण लावून धोंडास वाफेवर शिजू द्या. शिजल्यानंतर कुकरची वाफ पूर्णपणे निघू द्या. भांडं बाहेर काढून धोंडास थोडा थंड होऊ द्या आणि त्यानंतर काप करून सर्व्ह करा.

कोकणचा हा गोड पदार्थ एकदा चाखाच

तवसा म्हणजेच पिकलेली काकडी वापरून केला जाणारा हा धोंडास कोकणातील पारंपरिक चवीची ओळख करून देतो. घरात तवसा उपलब्ध असेल, तर नेहमीच्या वापरापेक्षा वेगळं काही करून पाहण्यासाठी ही रेसिपी नक्की ट्राय करता येईल.

logo
marathi.freepressjournal.in