मेष - दिवस चांगला राहील. मेहनत घेतली तर जास्ती काम होतील. आर्थिक आवक चांगली राहील. मुलांना यश मिळेल. प्रवास घडण्याची शक्यता. प्रवासात वस्तूंची काळजी घेणे महत्त्वाचे ठरेल.
वृषभ - आपल्या कार्यक्षेत्रात वादविवाद टाळणे आवश्यक ठरेल. खर्चाचे प्रमाण वाढेल. परंतु उत्पन्नही त्याच प्रमाणात वाढेल. प्रवास करावा लागू शकतो. व्यवसायात उलाढाल वाढेल.
मिथुन - आपल्या कामकाजात प्रगती होईल. गृहसौख्य वाढ होईल. जीवनसाथी तुमच्या मर्जीनुसार वागेल. वडिलोपार्जित संपत्तीची कामे मार्गी लागतील. मात्र भावंडांची वादविवाद टाळा.
कर्क - आर्थिक आवक चांगली राहील. विविध मार्गांनी धनलाभ होण्याची शक्यता. व्यवसाय धंद्यात नवीन कल्पना राबवू शकाल. जवळचे मित्रमंडळी भेटतील. प्रवासाचे योग.
सिंह - मन उत्तेजित व प्रसन्न करणार्या घटना घडल्यामुळे आनंदी राहाल. प्रलंबित कामांना गती द्याल. नवीन कल्पना सुचतील. जोडीदाराशी मधुर संबंध राहतील.
कन्या - एकाच वेळेस अनेक कामे करणे टाळा. गोंधळून जाऊ नका. वाहन सांभाळून चालवा. वाहनाच्या वेगावर नियंत्रण आवश्यक राहील. धन प्राप्ती चांगली राहील.
तुळ - आर्थिक आवक चांगली राहील. चैनीच्या वस्तूंच्या खरेदीसाठी पैसे खर्च कराल. मनामध्ये थोडी अस्वस्थता राहण्याची शक्यता. दूरच्या प्रवासाचे नियोजन होईल.
वृश्चिक - अनेक मार्गांनी धनप्राप्ती होऊ शकते. आर्थिक आवक उत्तम राहील. व्यवसायात नफ्याच्या प्रमाणात वाढ होईल. व्यवसायात नवीन बदल व्यवसायासाठी पोषक ठरतील.
धनु - आर्थिक प्राप्ती होईल. निरनिराळ्या लाभनि लाभान्वित व्हाल. मालमत्तेची अथवा जमीन जुमला याविषयीची स्वामी गतिशील होतील. कौटुंबिक समस्यांवर जास्त लक्ष देऊ नका.
मकर - एखाद्या कार्यक्रमात सहभागी भाग आपल्या बोलण्यावर वागण्यावर नियंत्रण ठेवा नाही तर रंगाचा बेरंग होऊ शकतो. कौटुंबिक सुख लाभेल. जीवनसाथी साथ मिळेल.
कुंभ - आपल्या कार्यक्षेत्रात अथवा कुटुंब परिवारात रागाला आवर घातला पाहिजे महत्त्वाची कामे लक्ष देऊन करा आरोग्याची काळजी घ्या वाहन जपून चालवा कायद्याची बंधने पाळणे आवश्यक ठरेल.
मीन - तरुण-तरुणींना प्रेमात यश मिळेल एखाद्या महत्त्वाच्या कार्यक्रमाला उपस्थित रहाल. आर्थिक बाजू चांगली राहील जीवनसाथीच्या वर्चस्वाखाली राहावे लागेल सुखसंवाद घडतील.