आजचे राशिभविष्य  
राशीभविष्य

आजचे राशिभविष्य,१८ एप्रिल २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, April 18, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष - एखादी महत्त्वाची घटना घडून आत्मविश्वासात वृद्धी होईल वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने व्यवहारिक उलाढाल यशस्वी होऊन आर्थिक लाभ होऊ शकतो कौटुंबिक मतभेद टाळणे हिताचे ठरेल.

वृषभ - कुटुंब परिवारात खेळीमेळीचे वातावरण राहील आरोग्य चांगले राहील जवळपासचे प्रवास होतील व्यवसायात नवीन गुंतवणूक होण्याची शक्यता त्यातून फायदा होईल.

मिथुन - कुटुंबातील ज्येष्ठांचा सल्ला ऐकणे योग्य ठरेल त्यामुळे आपलाच फायदा होईल व्यवसायात उलाढाल वाढून नफ्याचे प्रमाण वाढल्यासारखे वाटेल आत्मविश्वासाने कामे कराल.

कर्क - रखडलेल्या व्यवहारांना गती मिळेल आर्थिक लाभ होऊ शकतो ओळखी मध्यस्थी यशस्वी होण्याची शक्यता. मात्र सावधानतेने व्यवहार करा.

सिंह - सभा समारंभाची निमंत्रणे मिळतील एखाद्या कार्यक्रमात मानाचे स्थान मिळू शकते भाग्याची चांगली साथ राहील नवीन ओळखी होऊन यशाच्या वाढता कानावर येतील नावलौकीक वाढेल.

कन्या - रोजच्या कामात अडथळे येण्याची शक्यता महत्त्वाच्या कामांमध्ये विलंब लागू शकतो इतरांचा सल्ला उपयोगी पडेल मुलांच्या प्रगती च्या बातम्या कानावरती पडतील.

तुळ - सहकुटुंब सहपरिवार एखाद्या धार्मिक स्थळी भेट देण्याचे योग.आर्थिक परिस्थिती उत्तम राहील काही अनुकूल घटना घडल्यामुळे उत्साहात वाढ होईल.आपल्या शब्दाला मान मिळेल.

वृश्चिक - भाग्याची साथ मिळाल्यामुळे अनेक कामे होतील कामानिमित्त प्रवास घडू शकतात प्रवास कार्यसाधक राहतील मुलांच्या यशाच्या वार्ता कानावर येतील मानसन्मान मिळेल.

धनु - काही महत्त्वाच्या कामांचे नियोजन कराल प्रवास शक्यतो टाळलेला बरा. अचानक काही कामे जास्तीची करावी लागतील. प्रवास घडेल प्रवासात वाहनाच्या वेगावर ती नियंत्रण आवश्यक.

मकर - रखडलेली कामे मार्गी लावू शकाल अपेक्षित गाठीभेटी होतील. समाजातील मान्यवरांच्या सहवासात राहता येईल सामाजिक मानसन्मानाचे योग व्यवसायात भरभराट. कौटुंबिक सुख मिळेल.

कुंभ - मालमत्तेच्या कामात यश मिळेल मौजमजेसाठी मित्रमंडळींच्या समवेत पैसा खर्च कराल मात्र आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे ठरेल.

मीन - महत्त्वाच्या कामात यश मिळेल रखडलेली कामे मार्गी लावाल आपल्या कार्यक्षेत्रात तसेच आपल्या कुटुंब परिवारात अपेक्षित सहकार्य मिळत राहील विविध प्रकारचे लाभ होतील.

मोदी सरकार तोंडघशी! महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेत नामंजूर

ज्ञानेंविन वैराग्य ते काइ करावें बापेया?

महाराष्ट्र विधान परिषदेच्या १० जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान

महाराष्ट्रात जनावरांचे पहिले 'ब्युटी पार्लर'; लोकसहभागातून 'या' ग्रामपंचायतीचा नावीन्यपूर्ण उपक्रम

Mumbai : लोकलमधून पडून मृत्यू झालेल्या तरुणाच्या आईला ४ लाखांची भरपाई; उच्च न्यायालयाचा मध्य रेल्वेला दणका