मेष - आपल्या कार्यक्षेत्रात काही नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागण्याची तयारी ठेवा व्यवसाय धंद्यातील उलाढाल वाढून नफ्याच्या प्रमाणात वृद्धी झालेली दिसेल.
वृषभ - आजच्या दिवसभरात आपल्या अपेक्षेनुसार गोष्टी घडत जात असल्यामुळे आपल्या आत्मविश्वासात वाढ होईल आपल्या समोरील कामे आपण वेगाने कराल. निरनिराळे लाभ होतील.
मिथुन - महत्त्वाच्या कामांबाबत कोणाच्याही आश्वासनावर विसंबून राहू नका कार्यक्षेत्रात तुम्ही स्वतःचे कर्तृत्व दाखवू शकाल. मित्र मंडळाच्या वर्तुळातून तसेच कुटुंबातून सहाय्य मिळू शकते.
कर्क - कुटुंब परिवारात लहानसहान गोष्टींवरून वादविवाद निर्माण होण्याची शक्यता असल्याने ते जाणे महत्त्वाचे ठरेल. कुटुंबातील शांतता आपल्यावर अवलंबून आहे. थोडे सबुरीने घ्या.
सिंह - भाग्यकारक दिवस हाती घेतलेल्या कार्यात यश मिळण्यास वातावरण अनुकूल आहे आपल्या प्रयत्नांबरोबरच मतभेद टाळून मार्गक्रमण करणे हिताचे ठरेल.
कन्या - जुन्या गुंतवणुकीतून भरघोस आर्थिक फायदा होऊ शकतो. नवीन गुंतवणूक करताना तज्ञांचा सल्ला आवश्यक घ्या. सामाजिक मानसन्मान मिळू शकतो.
तुळ - आपल्या कार्यक्षेत्रात नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्याची तयारी ठेवा. व्यवसाय धंद्यातील अचानक कामे वाढल्यामुळे नियोजित कामात बदल करावा लागेल धावपळ होईल.
वृश्चिक - शत्रु हितशत्रूच्या कारवाया जरी वाढल्या तरी त्यांच्यावर मात करणे सहज शक्य होईल मात्र कुटुंबात वादविवादांच्या मुळे थोडीशी अस्थिर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
धनु - महत्त्वाची कामे पूर्ण करू शकाल बदलत्या परिस्थितीनुसार कार्यपद्धतीमध्ये बदल करावा लागेल. मित्रमंडळी मदत करू शकतात कौटुंबिक परिस्थिती सर्व सामान्य राहील.
मकर- आपल्या कार्यक्षेत्रात आपल्याला महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील निर्णय शांतपणे घ्या घाईगर्दीत घेतलेले निर्णय चुकू शकतात.
कुंभ - राहत्या घराविषयी काही समस्या समोर येऊ शकतात. मानवी उपद्रव याची शक्यता विभाग वाढवू नका स्वतःच्या - आरोग्याची काळजी घेणे गरजेचे ठरेल.
मीन - आजच्या दिवसात काही अनपेक्षित घटना घडल्यामुळे मनात गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते शांत चित्ताने विचार करून आपल्या समोरील निर्णय घ्या यशप्राप्ती होईल.