मेष - आजचा दिवस आपणास अनुकूल जाणार आहे.काही अनपेक्षित चांगल्या घटना घडू शकतात. आपल्या घरात कुटुंबामध्ये काही कार्यक्रम होऊ शकतो, तुमच्यासाठी तो अनुकूल असणार आहे.
वृषभ - नवीन कामाची सुरुवात करू नका. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यास आजचा दिवस अनुकूल नाही. निश्चित अशा प्रगतीसाठी वाट पहावी लागणार आहे.
मिथुन - आजचा दिवस आपणाला आपल्या कामाचे श्रेय मिळणार आहे. आपल्या हातून चांगले काम होणार आहे. इतर व्यक्ती सुद्धा आपणास सहकार्य देतील, शिवाय आपणाकडून प्रेरणा घेतील.
कर्क - काही आर्थिक प्रश्न असतील तर ते आज सुटणार आहेत. आपल्या विषयी असणारा आदर वाढणार आहे. भौतिक गोष्टींवर खर्च होण्याची शक्यता आहे. आपणास वरिष्ठ सहकार्य करतील.
सिंह - यशाचा आणि समृद्धीचा दिवस आहे. कल्पक दृष्टिकोन आणि संधी तुम्हाला थोड्या अधिक उत्पन्न मिळवून देण्याची शक्यता आहे. व्यवसायात वाढ होणार आहे. प्रवासाची शक्यता आहे.
कन्या - आपण आज आपला आत्मविश्वास वाढवला पाहिजे. कोणाशी वाद विवाद किंवा भांडण टाळणे आवश्यक आहे. कोणत्याही नात्यात दुरावा येऊ देऊ नका.
तुळ - आपल्या मध्ये आज चांगली ऊर्जा असणार आहे.तुमच्या सकारात्मक विचारांमुळे अनेकांचे सहकार्य मिळणार आहे. तुमच्या आनंदात आणि यशात ते भागीदार होणार आहेत.
वृश्चिक - आर्थिक दृष्ट्या आजचा दिवस ठीक असणार आहे.कामाच्या ठिकाणी असलेले सहकारी, मित्र आणि कुटुंब यांच्याशी चांगले संबंध ठेवण्याचे प्रयत्न करा.
धनु - आजचा दिवस सर्व बाजूनी अनुकूल असणार आहे. काही समस्या आल्या तरी त्या चांगल्या प्रकारे सोडवल्या जाणार आहेत. घरातील व्यवहार एकदम सुरळीत असणार आहेत.
मकर - तुमच्या व्यक्तिगत इच्छा पूर्ण करण्यासाठी आपणास इतरांची मदत मिळणार आहे.आपली आर्थिक वाढ निश्चित होणार आहे. एखादी चांगली बातमी कानावर पडेल.
कुंभ - आजचा दिवस आपणास आनंद देणार आहे. नातेवाइकांकडून आपणास सहकार्य मिळणार आहे. न्यायालयीन खटले आणि काही प्रश्न असल्यास त्यामध्ये यश येणार आहे.
मीन - आपले मन स्थिर असणार आहे. कौटुंबिक नाते जपण्याकडेकल असू द्यावा.आपणाला काही व्यक्तींचे सहकार्य लाभणार आहे. चांगले संदेश येण्याची शक्यता.