बिझनेस

रिअल इस्टेटमधील प्रायव्हेट इक्विटी गुंतवणुकीत १६ टक्के घसरण; गत आर्थिक वर्षात ३.६७ अब्ज डॉलर : ॲनारॉक

भारतीय रिअल इस्टेटमधील पीई गुंतवणुकीतील घट विदेशी गुंतवणूकदारांच्या उत्साहात घट झाल्यामुळे, जागतिक मॅक्रो-इकॉनॉमिक घटक आणि भू-राजकीय अस्थिरतेमुळे झाली आहे, असे ॲनारॉक कॅपिटलचे एमडी आणि सीईओ शोभित अग्रवाल यांनी सांगितले.

Swapnil S

नवी दिल्ली : रिअल इस्टेट क्षेत्रातील खासगी इक्विटी गुंतवणूक गेल्या आर्थिक वर्षात १६ टक्क्यांनी घसरून ३.६७ अब्ज अमेरिकन डॉलर झाली आहे, विदेशी गुंतवणूकदारांकडून कमी व्याज मिळत नसल्याने गुंतवणूक कमी झाल्याचे ॲनारॉकने म्हटले आहे. रिअल इस्टेट सल्लागार ॲनारॉकने ‘कॅपिटल फ्लक्स’ या आपल्या अहवालात निदर्शनास आणले की, भारतीय रिअल इस्टेटमधील खासगी इक्विटी (पीई) सौदे मागील वर्षातील ४,३५८ दशलक्ष डॉलरवरून २०२३-२४ मध्ये ३,६७४ दशलक्ष अमेरिकन डॉलरपर्यंत घसरले आहेत. रिअल इस्टेटमधील ‘पीई’ ओघ २०१९-२० मध्ये ५,१३८ दशलक्ष डॉलर्स, २०२०-२१ मध्ये ६,३७७ दशलक्ष डॉलर्स, २०२१-२२ आर्थिक वर्षात ४,२३६ दशलक्ष डॉलर इतकी झाली होती.

भारतीय रिअल इस्टेटमधील पीई गुंतवणुकीतील घट विदेशी गुंतवणूकदारांच्या उत्साहात घट झाल्यामुळे, जागतिक मॅक्रो-इकॉनॉमिक घटक आणि भू-राजकीय अस्थिरतेमुळे झाली आहे, असे ॲनारॉक कॅपिटलचे एमडी आणि सीईओ शोभित अग्रवाल यांनी सांगितले. एकूण गुंतवणुकीतील विदेशी भांडवलाचा हिस्सा आर्थिक वर्ष २४ मध्ये ६५ टक्क्यांवर घसरला आहे. तो मागील वर्षी ७६ टक्क्यांवर होता.

अहवालानुसार, गेल्या आर्थिक वर्षात भारतीय रिअल इस्टेटमधील एकूण भांडवलाच्या २९ टक्क्यांच्या तुलनेत देशांतर्गत गुंतवणूकदारांनी केलेली पीई गुंतवणूक वाढून २४ टक्के झाली आहे. आर्थिक वर्ष २४ मधील एकूण पीई गुंतवणुकीपैकी, ॲनारॉकने सांगितले की, शुद्ध इक्विटी सौद्यांचा वाटा ७३ टक्के होता तर कर्जाचा हिस्सा २४ टक्के होता. मागील वर्षी इक्विटी सौद्यांचा वाटा ६६ टक्के आणि कर्ज ३२ टक्के होता. आर्थिक वर्ष २४ मध्ये पीई व्यवहारांवर कार्यालयीन विभागाचे ५७ टक्के मूल्यासह वर्चस्व राहिले, ते मुख्यत्वे जीआयसी -ब्रुकफिल्ड रीट करारामुळे होय. गेल्या आर्थिक वर्षातील एकूण व्यवहार मूल्याच्या हा हिस्सा सुमारे ४० टक्के होता, असे सल्लागाराने सांगितले.

निवासी रिअल इस्टेटमध्ये पीई गुंतवणुकीचा सातत्यपूर्ण हिस्सा २८ टक्के असला तरी मूल्यानुसार त्यात १७ टक्क्यांची वार्षिक घट झाली आहे, असे अग्रवाल म्हणाले. वित्तीय वर्ष २४ मधील सौद्यांची संख्या मोठ्या प्रमाणात स्थिर असली तरी, सरासरी व्यवहारांचा आकार झपाट्याने कमी झाला.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी