नवी दिल्ली : गुंतवणूकदारांकडून पहिल्याच दिवशी मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर सरकारने मंगळवारी ऑफर फॉर सेल (ओएफएस) द्वारे सरकारी मालकीच्या बँक ऑफ महाराष्ट्र (बीओएम) मधील ६ टक्के हिस्सा विकण्याचा निर्णय घेतला.
फ्लोअर प्राइसवर सरकार सरकारी मालकीच्या कर्जदात्यामधील ६ टक्के हिस्सा विकून २,४९२ कोटी रुपये कमवेल.
बँक ऑफ महाराष्ट्रच्या विक्रीसाठीच्या ऑफरला मंगळवारी बाजारात प्रतिसाद मिळाल्याचे गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे सचिव अरुश चावला यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे. इश्यू बेस साइजच्या ४०० टक्के नोंदणी झाला. परिणामी सरकारने ग्रीन शू पर्यायाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे, असेही चावला म्हणाले.
बँक ऑफ महाराष्ट्र ओएफसीसाठी फ्लोअर प्राइस ५४ रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आला आहे. तो सोमवारच्या मुंबई शेअर बाजारावरच्या ५७.६६ रुपयांच्या बंद किमतीपेक्षा ६.३४ टक्के कमी आहे.