बिझनेस

BSNL कडून देशात IFTV सुविधा सुरु; स्कायप्रो आणि प्लेबॅाक्सटीव्ही सोबत हातमिळवणी

भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल)ने स्कायप्रोसह हातमिळवणी करत भारतात पहिली फायबर-बेस्ड इंट्रानेट टीव्ही सेवा सुरू केली आहे.

Sagar Sirsat

मुंबई : भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल)ने स्कायप्रोसह हातमिळवणी करत भारतात पहिली फायबर-बेस्ड इंट्रानेट टीव्ही सेवा सुरू केली आहे. या नवीन सेवेमुळे बीएसएनएल ग्राहकांना टिव्ही आणि इंटरनेटचा अनोखा अनुभव घेता येणार आहे. त्यामध्ये ग्राहक उच्च स्ट्रीमिंग गुणवत्तेत ५५० पेक्षा जास्त लाइव्ह टीव्ही चॅनेल आणि प्रीमियम ओटीटी ॲप्स पाहू शकतील.

हा उपक्रम लाइव्ह टेलिव्हिजन आणि ऑन-डिमांड ओटीटी कंटेंट एकाच सबस्क्रिप्शन अंतर्गत जोडणार आहे, ज्यामुळे देशभरातील लाखो प्रेक्षकांना परवडणाऱ्या दरात उत्तमोत्तम सेवा व मनोरंजनाचा लाभ घेता येणार आहे. या शुभारंभ प्रसंगी दूरसंचार मंत्री आणि ईशान्य प्रदेश विकास मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंधिया, बीएसएनएल बोर्डाचे सीएमडी ए. रॉबर्ट जे. रवी, दूरसंचार विभागाचे आयएएस, सचिव डॉ. नीरज मित्तल, महाराष्ट्र बीएसएनएलचे सीजीएम हरिंदर मक्कर, स्कायप्रोचे संचालक आणि सीटीओ डॉ. पवनप्रीत एस. धालीवाल, स्कायप्रोचे व्यवसाय प्रमुख नितीन सूद, प्लेबॉक्सटीव्हीचे संस्थापक आणि सीईओ आमिर मुलानी आणि प्लेबॉक्सटीव्हीचे संचालक सॅमसन जेसुदास उपस्थित होते.

एकत्र आणणं माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं; राज ठाकरेंचा हल्लाबोल

''कुठचाही 'झेंडा' नाही, मराठी हाच 'अजेंडा'; माझ्या मराठीकडे-महाराष्ट्राकडे वेड्यावाकड्या नजरेने पाहायचं नाही,'' वाचा राज ठाकरे यांचं संपूर्ण भाषण

दोघा पुतण्यांचे हात धरून सुप्रिया सुळेंनी काकांच्या शेजारी केलं उभं; पहा Video

''जर इथे येऊन धंदा करताय तर मराठी बोलायची लाज कसली?'' अभिनेते भरत जाधव यांचा संतप्त सवाल

गुजरातेत हिंदी सक्ती नसेल, तर ती महाराष्ट्रात कशासाठी? खासदार सुप्रिया सुळे यांचा संतप्त सवाल