संग्रहित छायाचित्र
बिझनेस

बनावट बँक खात्यांचा ‘एआय’च्या सहाय्याने शोध घ्या! ‘आरबीआय’चे बँकांना आदेश

बनावट व फसवणूक करणाऱ्या बँक खात्यांचा कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने शोध घ्या, असे आदेश रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सर्व बँकांना दिले आहेत.

Swapnil S

मुंबई : बनावट व फसवणूक करणाऱ्या बँक खात्यांचा कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने शोध घ्या, असे आदेश रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सर्व बँकांना दिले आहेत.

पतधोरणानंतर बोलताना गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी विविध विषयांवर आरबीआयने घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली.

दरम्यान, रेपो दर कायम ठेवल्याने ईएमआयमध्ये वाढ होणार नाही. मात्र, आरबीआयने ‘सीआरआर’मध्ये कपात केल्याने बँकांना अधिक निधी मिळणार आहे.

फसवणुकीसाठी गुन्हेगार बनावट बँक खात्यांचा वापर करतात. या खात्यांद्वारे ते काळा पैशांचे हस्तांतरण करतात. सर्वसामान्य लोकांना मोठ्या पैशाचे आमीष दाखवून त्यांची फसवणूक करतात. फसवणुकीचा पैसा ते बनावट खात्यांद्वारे अन्य बँकांमध्ये वळवतात. या खात्यांचा माग काढणे कठीण बनते, तसेच हा पैसा परत मिळवणे अशक्य बनते, असे दास म्हणाले.

Mumbai : कोस्टल रोडवर भरधाव BMW पुलावरून कोसळली; तिघांचा जागीच मृत्यू, अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

७१ टक्के मुंबईकर घेत आहेत प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधे

NCMC कार्ड नोंदणी व वितरण प्रक्रियेत बदल

Ganeshotsav 2026 : मुंबई ते मडगाव दरम्यान आणखी ४ विशेष गाड्या

Mumbai : नाल्यात कचरा फेकला तर कारवाई; वाहनांवर जीपीएससह CCTV ची नजर