बिझनेस

टॅरिफमुळे सोन्याचा उच्चांक; तर रुपयाचा नवा नीचांक

सलग सहाव्या सत्रात सोन्याच्या किमतीत वाढ झाल्याने सोमवारी राजधानी दिल्लीत सोन्याच्या किमती १,००० रुपयांनी वाढून...

Swapnil S

नवी दिल्ली : सलग सहाव्या सत्रात सोन्याच्या किमतीत वाढ झाल्याने सोमवारी राजधानी दिल्लीत सोन्याच्या किमती १,००० रुपयांनी वाढून १,०५,६७० रुपये प्रति १० ग्रॅम या विक्रमी उच्चांकावर पोहोचल्या. या महिन्यात अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपात होण्याची अपेक्षा आणि परदेशातील बाजारपेठेतील मागणी वाढल्याने ही वाढ झाली.

ऑल इंडिया सराफा असोसिएशनच्या मते, ९९.९ टक्के शुद्ध मौल्यवान धातूचा दर शनिवारी १,००० रुपयांनी वाढून १,०४,६७० रुपये प्रति १० ग्रॅम या विक्रमी पातळीवर पोहोचला होता.

स्थानिक बाजारात, ९९.५ टक्के शुद्ध सोन्याचा दर सोमवारी ८०० रुपयांनी वाढून १,०४,८०० रुपये प्रति १० ग्रॅम (सर्व कर समाविष्ट) या नव्या उच्चांकावर पोहोचला. मागील बाजार सत्रात ते १,०४,००० रुपये प्रति १० ग्रॅम होते.

याव्यतिरिक्त, सोमवारी चांदीच्या किमती १,००० रुपयांनी वाढून १,२६,००० रुपये प्रति किलो (सर्व करांसह) या नवीन उच्चांकावर पोहोचल्या. शनिवारी चांदीचा भाव ६,००० रुपयांनी वाढून १,२५,००० रुपये प्रति किलोचा विक्रमी उच्चांक गाठला.

रुपयाचा नवा नीचांक

मुंबई : भारत-अमेरिका व्यापार करारातील अनिश्चितता आणि आयातदारांकडून डॉलरची मागणी वाढल्याने सोमवारी रुपया १ पैशाने घसरून ८८.१० या नव्या नीचांकी पातळीवर बंद झाला. परदेशी चलन व्यापाऱ्यांनी सांगितले की, आज सकाळी रुपया कमकुवत उघडला आणि दिवसभरात अमेरिकन चलनाच्या तुलनेत ८८.३३ या त्याच्या सर्वकालीन दिवसभरातील नीचांकी पातळीवर गेला. सतत परदेशी निधी काढून घेत असल्याने रुपया कमजोर झाला. इंटरबँक फॉरेन एक्स्चेंज मार्केटमध्ये अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया ८८.१८ वर उघडला, नंतर तो दिवसभरात ८८.३३ या सर्वकालीन नीचांकी पातळीवर घसरला, कारण अमेरिकेने भारतावर अतिरिक्त व्यापार शुल्क लादल्याने भारताच्या व्यापार तूटबद्दल चिंता निर्माण झाली.

देशांतर्गत चलन अखेर ८८.१० या सर्वकालीन नीचांकी पातळीवर बंद झाला, जो मागील बंद दरापेक्षा १ पैशाने घसरला. शुक्रवारी, रुपयाने पहिल्यांदाच प्रति अमेरिकन डॉलर ८८ चा टप्पा ओलांडला आणि ८८.०९ या सर्वकालीन नीचांकी पातळीवर बंद झाला. दिवसभरात तो ८८.३३ च्या सर्वकालीन नीचांकी पातळीवर पोहोचला होता.

GST ५ आणि १८%; नवीन दराचा ‘घट’ २२ सप्टेंबरपासून

Maratha Reservation Protest : सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसान भरपाईचे काय? उच्च न्यायालयाचा मराठा आयोजकांना सवाल

मराठा आरक्षणाच्या जीआरवरून OBC नेत्यांमध्ये मतमतांतरे; जीआर प्रत फाडत लक्ष्मण हाके यांचे आंदोलन; भुजबळांचा कोर्टात जाण्याचा इशारा

Mumbai : २३८ एसी लोकल खरेदीला मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४८२६ कोटींची मान्यता

कोकणातून परतणाऱ्या गणेशभक्तांचे हाल; मुंबई-गोवा महामार्गावर ३ किमीपर्यंत वाहनांच्या रांगाच रांगा