बिझनेस

दुसऱ्या तिमाहीतील मंदीनंतर भारतीय अर्थव्यवस्था सुधारण्याच्या मार्गावर; आरबीआय बुलेटिनमध्ये आशावाद

सणासुदीतील मोठ्या प्रमाणावरील व्यवहारांमुळे आणि ग्रामीण भागातील मागणीत सातत्याने वाढ झाल्यामुळे सप्टेंबर तिमाहीत आलेल्या मंदीतून भारतीय अर्थव्यवस्था सावरत आहे,

Swapnil S

मुंबई : सणासुदीतील मोठ्या प्रमाणावरील व्यवहारांमुळे आणि ग्रामीण भागातील मागणीत सातत्याने वाढ झाल्यामुळे सप्टेंबर तिमाहीत आलेल्या मंदीतून भारतीय अर्थव्यवस्था सावरत आहे, असा आशावाद रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) मंगळवारी बुलेटिनमध्ये व्यक्त केला आहे.

डिसेंबरच्या बुलेटिनमधील ‘स्टेट ऑफ द इकॉनॉमी’ वरील लेखात नमूद केले की, जागतिक अर्थव्यवस्था स्थिर वाढ आणि मध्यम किरकोळ महागाईसह लवचिकता प्रदर्शित करत आहे. तर २०२४-२५ च्या तिसऱ्या तिमाहीसाठी उच्च वारंवारता निर्देशक (HFIs)) सूचित करतात की भारतीय अर्थव्यवस्था दुसऱ्या तिमाहीमधील मंदावल्यानंतर आता सणासुदीच्या काळातील मजबूत खरेदीमुळे आणि ग्रामीण भागातील मागणीत सतत वाढ होत असल्याने भारतीय अर्थव्यवस्था सावरत आहे, असे त्यात म्हटले आहे.

आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर मायकल देबब्रत पात्रा यांच्या नेतृत्वाखालील एका टीमने लिहिलेल्या लेखात रब्बीच्या उत्तम पेरणीमुळे शेतीसाठी आणि त्यामुळे ग्रामीण भागातील खरेदीच्या मागणीत वाढ होण्याची शक्यता दिसत आहे.

चालू आर्थिक वर्षातील जुलै-सप्टेंबर या कालावधीत भारताचा जीडीपी वाढ सात-तिमाहीतील नीचांकी ५.४ टक्क्यांवर आला. तथापि, आरबीआयने म्हटले आहे की, बुलेटिनमध्ये व्यक्त केलेले विचार लेखकांचे आहेत आणि ते मध्यवर्ती बँकेच्या मतांचे प्रतिनिधित्व करत नाहीत.

गुजरातेत हिंदी सक्ती नसेल, तर ती महाराष्ट्रात कशासाठी? खासदार सुप्रिया सुळे यांचा संतप्त सवाल

आज विजयी मेळावा; उद्धव-राज ठाकरे वरळीत एकाच मंचावर येणार

‘जय गुजरात’मुळे वादंग; अमित शहांपुढे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या घोषणेमुळे विरोधक संतप्त

हायकोर्टाची सुनावणी सोमवारपासून लाईव्ह; सुरुवातीला पाच न्यायमूर्तींचा समावेश

मथुरेची शाही ईदगाह मशीद वादग्रस्त संरचना नाही; अलाहाबाद उच्च न्यायालयाने हिंदू पक्षाची याचिका फेटाळली