मारुती सुझुकी मारुती सुझुकी
बिझनेस

Maruti Suzuki Swift 2024 : नव्या रुपात मारुती स्विफ्ट लॉन्च; उत्कृष्ट मायलेज अन् फीचर्सही झक्कास, जाणून घ्या किंमत

Suraj Sakunde

मुंबई : देशातील सर्वात प्रमुख वाहन निर्माता कंपनी असलेल्या मारूती सुझुकीनं आपली सर्वात लोकप्रिय हॅचबॅक कार स्विफ्टचं नवं मॉडेल (Maruti Suzuki Swift 2024 Launch) लॉन्च केलं आहे. New Swift 2024चे अधिकृत लॉन्चिंग झाल्यापासून तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आज आम्ही तिच्या खास गोष्टींबद्दल तुम्हाला माहिती देणार आहोत.

'या' पाच व्हेरियंटमध्ये उपलब्ध-

नवीन स्विफ्ट 2024 5 व्हेरियंटमध्ये सादर करण्यात आली आहे. यामध्ये LXI, VXI, VXI (O), ZXI आणि ZXI+ प्रकारांचा समावेश आहे. यात LXI बेस व्हेरिएंट आहे. तर VXI आणि VXI (O) ही मिड व्हेरियंट आहेत. तर ZXI आणि ZXI+ हे टॉप व्हेरियंट म्हणून सादर करण्यात आली आहेत.

9 कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध नवी स्विफ्ट-

हे वाहन तुम्हाला 9 रंगांच्या पर्यायासह उपलब्ध करून दिले जात आहे. नवीन स्विफ्ट ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल अशा दोन प्रकारच्या गिअर्समध्ये उपलब्ध असेल. कंपनीचा दावा आहे की नवीन स्विफ्ट पूर्वीपेक्षा 10% (मॅन्युअल) आणि 14% (स्वयंचलित) अधिक मायलेज देईल.

न्यू जनरेशन स्विफ्टमध्ये फीचर्सचा भरणा-

न्यू जनरेशन स्विफ्टमध्ये खास फीचर्सचा भरणा आहे. कारमध्ये मागील बाजूस डिफॉगर देण्यात आला आहे. जिचा वापर पाऊस आणि धुक्यामध्ये चांगल्या दृश्यतेसाठी होऊ शकतो.

नवीन स्विफ्टला हॅलोजन प्रोजेक्टर हेडलॅम्प मिळत आहेत, जे रात्रीच्या अंधारातही वाहनाला उत्कृष्ट रोषणाई आणि स्टायलिश लुक देतात. यासोबतच यामध्ये हिल स्टार्ट असिस्ट देखील देण्यात आला आहे, जो उतारावर वाहन सुरू करण्यास मदत करतो.

किती असेल किंमत:

नवीन स्विफ्टच्या किंमतीबद्दल बोलायचा झाल्यास या कारची सुरुवातीची किंमत 6.49 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. तर तिच्या टॉप व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 9.64 लाख रुपये आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, नवीन स्विफ्ट बनवण्यासाठी कंपनीकडून 1,450 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे.

नवीन स्विफ्ट 2024 चे बुकिंग सुरू झाले आहे! तुम्ही फक्त 11,000 रुपये भरून ती ऑनलाइन बुक करू शकता किंवा तुमच्या जवळच्या डीलरला भेट देऊ शकता. या कारची डिलिव्हरी जून 2024 पासून सुरू होणार आहे.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस