अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे संग्रहित छायाचित्र 
बिझनेस

नवीन आयकर विधेयकावर पावसाळी अधिवेशनात चर्चा; अर्थमंत्री सीतारामन यांची लोकसभेत माहिती

नवीन प्राप्तिकर विधेयक संसदेच्या पावसाळी अधिवेशनात चर्चेसाठी घेतले जाईल, असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी सांगितले.

Swapnil S

नवी दिल्ली : नवीन प्राप्तिकर विधेयक संसदेच्या पावसाळी अधिवेशनात चर्चेसाठी घेतले जाईल, असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी सांगितले.

लोकसभेत वित्त विधेयक २०२५ वरील चर्चेला उत्तर देताना, सीतारामन म्हणाल्या की, १३ फेब्रुवारी रोजी सभागृहात सादर करण्यात आलेले नवीन आयकर विधेयक सध्या निवड समितीद्वारे पडताळले जात आहे. निवड समितीला संसदेच्या पुढील अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. आम्ही ते (नवीन आयकर विधेयक) पावसाळी अधिवेशनात चर्चेसाठी घेऊ, असे सीतारामन म्हणाल्या.

संसदेचे पावसाळी अधिवेशन साधारणपणे जुलैमध्ये बोलावले जाते आणि ते ऑगस्टपर्यंत चालते. १९६१ च्या प्राप्तिकर कायद्याच्या अर्ध्या आकाराचे सरलीकृत प्राप्तिकर विधेयक, खटल्यांची व्याप्ती आणि नवीन व्याख्या कमी करून कर निश्चितता करण्याचा प्रयत्न करते, असे आयकर विभागाने यापूर्वी सांगितले होते.

नवीन विधेयकात २.६ लाख शब्दांची संख्या आहे, जी आयटी कायद्यातील ५.१२ लाखांपेक्षा कमी आहे. विद्यमान कायद्यातील ८१९ प्रभावी कलमांविरुद्ध कलमांची संख्या ५३६ आहे.

चाप्टर्स अर्थात अध्यायांची संख्या देखील ४७ वरून २३ पर्यंत निम्मी कमी करण्यात आली आहे. आयकर विधेयक २०२५ मध्ये सध्याच्या कायद्यातील १८ च्या तुलनेत ५७ टेबल्स आहेत आणि १,२०० ‘प्रोव्हिसो’ आणि ९०० स्पष्टीकरणे काढून टाकली आहेत.

मतदारच डिलीट केले! राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर आरोप

मुंबई उच्च न्यायालयाला पुन्हा बॉम्बची धमकी; आठवड्याभरात दुसरी घटना, पोलिसांकडून अलर्ट जारी

मालेगाव बॉम्बस्फोटातील निर्दोष सुटलेल्या आरोपींना हायकोर्टाची नोटीस

मराठा समाजाला मोठा दिलासा! हैदराबाद गॅझेटविरोधातील जनहित याचिका हायकोर्टाने फेटाळली

...म्हणून मला मोदींना बोलण्याचा नैतिक अधिकार नाही! पंच्याहत्तरीनंतरही सक्रिय असलेल्या शरद पवारांचे वक्तव्य