@sundarpichai
बिझनेस

पंतप्रधान मोदींनी घेतली फ्रान्समध्ये पिचाई यांची भेट; ‘भारताच्या डिजिटल परिवर्तना’वर चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांची भेट घेऊन त्यांनी एआयमुळे भारतात उपलब्ध होणाऱ्या अविश्वसनीय संधीबद्दल चर्चा केली.

Swapnil S

पॅरिस : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांची भेट घेऊन त्यांनी एआयमुळे भारतात उपलब्ध होणाऱ्या अविश्वसनीय संधीबद्दल चर्चा केली. पॅरिसमधील ‘एआय ॲक्शन समिट’ला उपस्थित राहण्यासाठी आलेल्या भारतीय वंशाचे अल्फाबेट इंक. सीईओ पिचाई यांनी भारतातील डिजिटल परिवर्तनवर गुगल आणि भारत एकत्र कसे कार्य करू शकतात यावर देखील चर्चा केली.

एआय ॲक्शन समिटसाठी पॅरिसमध्ये असताना आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून आनंद झाला. एआय भारतात आणणाऱ्या अतुलनीय संधी आणि भारताच्या डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनवर आम्ही एकत्र काम करण्याच्या मार्गांवर चर्चा केली, असे पिचाई यांनी चित्रांसह ‘एक्स’वर पोस्ट केले.

यावर मोदींनी प्रत्युत्तर दिले. भारत एआयमध्ये उल्लेखनीय प्रगती करत आहे, सार्वजनिक हितासाठी त्याचा फायदा घेत आहे. आम्ही जगाला आवाहन करतो की यावे आणि आमच्या राष्ट्रात गुंतवणूक करावी आणि आमच्या युवा शक्तीचा लाभ घ्यावा. सुंदरपिचाई, तुम्हाला भेटून आनंद झाला, असे मोदींनी ‘एक्स’वर पोस्ट केले. मोदी आणि पिचाई यांच्यात शेवटची भेट सप्टेंबर २०२४ मध्ये न्यूयॉर्कमध्ये झाली होती.

न्यायमूर्ती सूर्यकांत देशाचे ५३ वे सरन्यायाधीश होणार; २४ नोव्हेंबरला स्वीकारणार पदभार

किडनॅपर रोहित आर्यचा माजी मंत्री दीपक केसरकर यांच्याशी संबंध? सरकारने करोडो रुपये बुडवल्याचा आरोप; केसरकर म्हणाले, "होय मी त्याला...

मोठी बातमी! १७ मुलांना ओलिस ठेवणारा आरोपी पोलिस चकमकीत ठार; नेमकं काय घडलं?

Mumbai : ऑडिशनच्या बहाण्याने १७ अल्पवयीन मुलांचे दिवसाढवळ्या अपहरण; अखेर १ तासाच्या थरार नाट्यानंतर मुलांची सुटका, आरोपी ताब्यात

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरण : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना चौकशी आयोगाची कारणे दाखवा नोटिस; उत्तर न दिल्यास होणार कारवाई