मनोरंजन

पूजा एंटरटेनमेंटचा 'बडे मियाँ छोटे मियाँ' २०२३ गाजवणार!

वृत्तसंस्था

महामारीनंतर बॉक्स ऑफिस अप्रत्याशित झाले. परंतु यादरम्यान एक गोष्ट पाहायला मिळाली ती म्हणजे दर्शकांचे फ्रँचायझींवरील प्रेम. या वर्षी जिथे अनेक स्टार्स आपल्या चित्रपटांसह बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात अपयशी ठरले, तिथे हिट चित्रपटांच्या फ्रँचायझींनी प्रेक्षकांना केवळ चित्रपटगृहांकडे आकर्षित केले नाही तर बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कलेक्शन करत राज्य केले. त्यामुळे प्रेक्षकांचे फ्रँचायझींवरील प्रेम वाढत आहे हि गोष्ट स्पष्ट झाली आहे. यादरम्यान, 'भूल भुलैया २' पासून 'दृष्यम २' आणि 'केजीएफ-२' पर्यंत, या फ्रँचायझींना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तसेच, २०२२ मध्ये प्रेक्षकांना प्रभावित करणे कठीण असताना, काही विश्वासार्ह फ्रँचायझींनी यशस्वीपणे प्रेक्षकांची मने जिंकत बॉक्स ऑफिसवर मोठ्या संख्येने कमाई केली आहे.

आता २०२२ हे वर्ष संपत येत असून २०२३ वर्ष सुरू होणार आहे आणि अनेक चित्रपट त्यांच्या रिलीजच्या प्रतीक्षेत आहेत. अशातच, चित्रपटांसाठी प्रेक्षकांचे निर्णय लक्षात घेऊन, असे म्हणता येईल की येत्या वर्षी फ्रँचायझी चित्रपट पुन्हा एकदा धमाल करतील आणि या फ्रँचायझी चित्रपटांपैकी एक पूजा एंटरटेनमेंटचा आगामी चित्रपट 'बडे मियाँ छोटे मियाँ' आहे. या चित्रपटात दर्शकांना 'फ्रेंचायझी पॉवर'सोबतच 'स्टार पॉवर'ही पाहायला मिळणार आहे. कारण या चित्रपटात पहिल्यांदाच अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ पडद्यावर एकत्र दिसणार असून, याचा आस्वाद प्रेक्षकांना नक्कीच घेता येईल.

पूजा एंटरटेनमेंटचा आगामी चित्रपट 'बडे मियाँ छोटे मियाँ'मध्ये अक्षय कुमार, टायगर श्रॉफ आणि पृथ्वीराज सुकुमारन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तसेच, या चित्रपटाचे दिग्दर्शन अली अब्बास जफर यांनी केले असून वाशू भगनानी, जॅकी भगनानी आणि दीपशिखा देशमुख यांनी निर्मिती केली आहे.

आम्ही भाजप मुख्यालयात येतो, अटक कराच! अरविंद केजरीवाल यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट आ‌व्हान

पाचव्या टप्प्यातील प्रचार संपला; अखेरच्या क्षणी मतदार भेटीसाठी सर्वपक्षीय लगबग

मोदींच्या बुलडोझरच्या वक्तव्याला इंडिया आघाडीचा आक्षेप; निवडणूक आयोगाने मोदींवर कारवाई करावी - खर्गे

क्रॉफर्ड मार्केटने टाकली कात, लवकरच मुंबईकरांच्या सेवेत

'त्या' कंपनीचे अजून ८ बेकायदा होर्डिंग्ज, BMC ची रेल्वेला नोटीस; पालिकेने होर्डिंग हटवल्यास खर्च रेल्वेकडून वसूल करणार