मनोरंजन

'बाईपण भारी देवा'ची टीम महालक्ष्मी देवीच्या दर्शनाला

चित्रपटाचं टायटल सॉंग मुंबईतील श्री महालक्ष्मी मंदिरात लॉंच

नवशक्ती Web Desk

स्त्री-शक्तीबद्दल काही सांगू पाहणाऱ्या चित्रपटाच्या टीमने श्री महालक्ष्मी देवीचं दर्शन घेणं हा एक सुंदर योग्य आहे. 'बाईपण भारी देवा' चित्रपटाचं टायटल सॉंग मुंबईतील श्री महालक्ष्मी मंदिरात लॉंच करण्यात आलं. या गाण्याच्या लॉंचिंग सोहळ्याला दिग्दर्शक केदार शिंदे,अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, दीपा परब, शिल्पा नवलकर आणि संगीतकार साई-पियुष उपस्थित होते. 'बाईपण भारी देवा' चित्रपटातील या शीर्षक गीतावर रिलीज आधीच लोकांनी ठेका धरला आहे.

जिओ स्टुडियोजचा 'बाईपण भारी देवा' हा चित्रपट प्रत्येक स्त्रीला आता स्वतःसाठी देखील जगायला शिकवणार हे नक्की.. तेव्हा आता तयार रहा.. केदार शिंदेंचा स्पेशल टच असलेला, सहा गुणी अभिनेत्रींनी चित्रपटात उडवलेली धमाल, अनुभवायला!

'बाईपण भारी देवा' या चित्रपटात दमदार अभिनेत्री आहेत. रोहिणी हट्टंगडी,वंदना गुप्ते,सुकन्या मोने,शिल्पा नवलकर,सुचित्रा बांदेकर आणि दीपा परब अश्या मातब्बर अभिनेत्री यात आहेत. 'बाईपण भारी देवा' याच महिन्यात ३० जून,२०२३ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

संजय राऊत यांना गंभीर आजार; बाहेर जाण्यास, गर्दीत मिसळण्यास निर्बंध, पोस्ट करीत म्हणाले - 'नवीन वर्षात भेटू'

New Rules From November 1: उद्यापासून बँकिंग, GST, आधार आणि पेन्शनमध्ये मोठे बदल; तुमच्यावर कसा होणार परिणाम? जाणून घ्या

Powai Hostage Case : 'तो आधी फ्रेंडली होता, नंतर...'; ओलिस ठेवलेल्या मुलीने सांगितला घटनेचा थरार

Powai Hostage Case : माजी मंत्री दीपक केसरकरांचा जुना व्हिडिओ व्हायरल; रोहित आर्यच्या प्रकल्पाचं केलं होतं कौतुक

कल्याणमध्ये ३० वर्षांपासून राहणाऱ्या नेपाळी महिलेचा पर्दाफाश; भारतीय कागदपत्रांसह मुंबई विमानतळावर घेतले ताब्यात