मनोरंजन

बिग बॉस फेम शिव ठाकरेला दुखापत ; चाहत्यांनी दिला काळजी घेण्याच सल्ला, व्हिडिओ व्हायरल

खतरो के खिलाडी १३ मध्ये स्टंट करताना शिव ठाकरेला दुखापत झाली असल्याचे सांगितलं जातंय

नवशक्ती Web Desk

खतरों के खिलाडी 13 ची शूटिंग सध्या साऊथ आफ्रिकेमध्ये सुरु आहे. बिग बॉस १६ मधील स्पर्धक शिव ठाकरे आणि अर्चना गौतम हे देखील खतरो के खिलाडी १३ मध्ये सहभागी झाले आहेत. या दोघांमध्ये बिग बॉसमध्ये असल्यापासून वाद बघायला मिळतो आहे. खतरो के खिलाडी १३ मध्ये देखील त्यांचे वाद होत आहेत.

शिव ठाकरे याने सोशल मीडीयावर नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. शिव ठाकरेच्या हाताला मोठी जखम झाल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्याच्या हाताला टाके देखील पडल्याचे दिसत आहेत. त्याचा हा व्हिडिओ पाहून त्याच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण झाल्याचे दिसत आहे.

शिवने शेअर केलेल्या व्हिडिओत तो जबरदस्त लुकमध्ये दिसत आहे. या व्हिडिओत तो आपला मोबाईल कॅमेरा आपल्या हाताकडे वळवतो आणि त्याची जखम दाखवतो. यावेळी त्याच्या हाताला झालेली जखम आणि पडलेले टाके दिसून येत आहे. शिव ठाकरेने शेअर केलेला व्हिडिओ बघून त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्य प्रमाणावर व्हायरल होत आहे. त्याच्या चाहत्यांनी त्याला काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. एका चाहत्याने त्याला काय झालं? असा प्रश्न देखील विचारला आहे. खतरो के खिलाडी १३ मध्ये स्टंट करताना शिव ठाकरेला दुखापत झाली असल्याचे सांगितलं जात आहे.

"पटेल जिंकले तरी नेहरू PM कसे?" इतिहास सांगत अमित शहांचा काँग्रेसवर पलटवार

लाडक्या बहिणींना दिलासा; पात्र बहिणींसाठी योजना सुरूच राहणार, ८ हजार कर्मचाऱ्यांकडून रक्कम वसूल

‘५०% रक्कम भरा आणि दंड मिटवा’, सरकारचा मोठा निर्णय : दंडाची रक्कम FASTag मधून वसूल होणार

Nashik : त्र्यंबकेश्वरमध्ये आईनेच तब्बल ६ मुलांना विकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस; जिल्हाधिकाऱ्यांकडून सखोल चौकशीचे आदेश

BCCI कडून अखेरच्या क्षणी IPL लिलाव यादीत मोठा बदल; माजी RCB खेळाडूसह नवीन ९ जणांचा समावेश