मनोरंजन

Bigg Boss Marathi 5: 'हा फॅमिलीसोबत बघता येणारा प्रोग्राम आहे का?' योगिता चव्हाणच्या नवऱ्याने केली संतप्त पोस्ट

Tejashree Gaikwad

Bigg Boss Marathi New Season Day 10: 'बिग बॉस मराठी'च्या घरात काल (मंगळवारी) 'कॅप्टनसीची बुलेट ट्रेन' हे कॅप्टनसी कार्य पार पडले. या टास्कदरम्यान घरातील सर्व सदस्य टास्क जिंकून कॅप्टन होण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करताना दिसले. याचदरम्यान अभिनेत्री निक्की तांबोळी आणि रॅपर आर्या जाधवमध्ये कडाक्याचं भांडण झालेलं पाहायला मिळालं. एकमेकींसोबत भिडताना त्या कालच्या भागात दिसल्या. 'कॅप्टनसीची बुलेट ट्रेन' या टास्कमध्ये सगळ्यांची जोरदार खेळ खेळला. यादरम्यान अनेक सदस्यांमध्ये भांडणं झाली. अखेरीस बिग बॉस मराठीच्या या पर्वातील पहिला कॅप्टन होण्याचा मान अंकिता वालावलकरला मिळाला. अंकितच्या या यशामध्ये तिची मैत्रीण योगिता चव्हाणचाही वाटा होता. परंतु या संपूर्ण टास्कला बघून योगिता चव्हाणच्या नवऱ्याने अभिनेता सौरभ चौघुलेने सोशल मीडियावर एक संतप्त पोस्ट केली आहे.

या शोच्या अगदी पहिल्या दिवसामधून दोन गट पडलेले दिसत आहेत. एका गटामध्ये निक्की, अरबाज, वैभव, जान्हवी असा ग्रुप आहे तर अभिजितची एक टीम आहे. कालच्या कॅप्टन्सी टास्क दरम्यान पहिल्याच फेरीत अंकिता आणि अभिजितने बाजी लीड घेतल्याने निक्कीच्या टीम मेंबर्स चांगलेच तापलेले दिसले. यावेळी त्यांनी अनेक अपशब्द वापरले. या खेरीज आर्या निक्की आणि जान्हवीमध्ये धक्काबुक्की झालेलीही दिसली. याच दरम्यान या टास्क अंकिताने जिंकला. त्यासाठी तिला योगिताने मदत केली. पण एकंदरीत टास्क दरम्यान बिग बॉस मराठीचं घर तापलेले दिसलं. टास्क दरम्यान वापरली गेलेली चुकीची भाषा, हातापाई यारून या टास्कच्या संचालक झालेल्या वर्षा उसगांवकर यांनी देखील नाराजी व्यक्त केली.

योगिता चव्हाणच्या पतीची पोस्ट चर्चेत

बिग बॉस मराठीतच्या घरातलं हे वातावरण बघून. या शोची स्पर्धक योगिता चव्हाण हीच नवरा अभिनेता सौरभ चौघुलेने नाराजी व्यक्त केली आहे. त्याने सदस्यांची चुकीची भाषा आणि वागणुकीला लक्ष करत सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली आहे. "लायकी, भीक अशी घाणेरडी भाषा वापरली जाते… खरंच हा कुटुंबासह पाहता येणारा कार्यक्रम आहे का?” असा प्रश्न सौरभने त्याच्या पोस्टमधून विचारला आहे.

'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन सुरू होऊन अवघे दहा दिवस पूर्ण झाले आहेत. अगदी पहिल्या दिवसापासूनचा हा शो अनेक गोष्टींमुळे सतत चर्चेत येत आहे.

राज्यात 'महिला राज'ची चर्चा; सुप्रिया सुळे, रश्मी ठाकरे यांची नावे मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत

मुरबाडच्या जागेवर शिवसेना ठाकरे गटाचाही दावा; महाविकास आघाडीत रस्सीखेच वाढणार!

हिरे क्षेत्र गंभीर संकटात; गेल्या तीन वर्षांत आयात-निर्यातीत मोठी घट,'जीटीआरआय’चा दावा

नव्या सरकारच्या स्वागतासाठी मंत्रालयात स्वच्छता मोहीम

‘मला काहीतरी सांगायचंय’; मुख्यमंत्र्यांच्या जीवनावरील नाटक, लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला