मनोरंजन

Bigg Boss Marathi 5: "आठ दिवस बोलली नाही आणि आता..." 'फ्रेंडशिप डे'च्या टास्कदरम्यान छोटा पुढारीने सुनावलं

Friendship Day 2024: आज जगभरात फ्रेंडशिप डे साजरा होत असून रितेश भाऊच्या धक्क्यावरदेखील 'फ्रेंडशिप डे' साजरा होणार आहे.

Tejashree Gaikwad

Bigg Boss Marathi New Season : मैत्री म्हटलं की मजा, मस्ती आणि भांडण हे आलंच. 'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन सुरू होऊन आठवडा पूर्ण झाला असून आठवड्याभरातच घरातील सदस्यांमधील मैत्रीचं नातं अलगद फुलताना दिसून येत आहे. आज जगभरात फ्रेंडशिप डे साजरा होत असून रितेश भाऊच्या धक्क्यावरदेखील 'फ्रेंडशिप डे' साजरा होणार आहे. नव्या मैत्रीची नवीन समीकरणं पाहायला प्रेक्षकांनादेखील आवडेल.

'बिग बॉस मराठी'च्या घरातील सदस्य एकमेकांच्या मागे बरंच काही बोलताना दिसून येतात. पण आज रितेश भाऊने त्यांना आमने-सामने उभं केलेलं पाहायला मिळेल. तसेच त्यांच्या मनातील पोलदेखील खोलेल. फ्रेंडशिप डेनिमित्त 'बिग बॉस मराठी'च्या मंचावर 'दोस्तीत कुस्ती आणि फुल ऑन मस्ती' पाहायला मिळणार आहे.

'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनचा फ्रेंडशिप डे स्पेशल प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये घरातील सदस्य फ्रेंडशिप डेचं खास लॉकेट एकमेकांना देत 'मैत्री दिन' साजरा करताना दिसत आहेत. भित्रा मित्र, दगाबाज मित्र, खोटारडा मित्र, बालिश मित्र, डबलढोलकी मित्र, असे वेगवेगळे लॉकेट सदस्य त्यांच्या मित्रांना घालताना दिसून येणार आहेत.

प्रोमोमध्ये योगिता छोटा पुढारी अर्थात घन:श्याम दरवडेला 'डबलढोलकी मित्र' हे लॉकेट देताना दिसून येत आहे. त्यावर घन:श्याम म्हणतो,"बघितलं ग्रुपची ताकद किती असते". यावर योगिता म्हणते,"कृपया मला बोलू द्या". तर छोटा पुढारी म्हणतो,"बोला.. आठ दिवस बोलली नाही...आता बोला".

मोठी बातमी! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर; दुबार मतदान रोखण्यासाठीही आणलं खास 'टूल'

सातारा जिल्ह्यातील 'राधा' म्हशीचा जगात डंका; सर्वात बुटकी म्हैस म्हणून 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये नोंद

ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला गती; देशातील सर्वात लांब शहरी बोगदा

कोइंबतूर विमानतळाजवळ गँगरेप प्रकरण; पोलिसांवर हल्ला करून पळण्याचा प्रयत्न करणारे तिघे अटकेत

डॉ. संपदा मुंडे मृत्यू प्रकरण : बेटी पढ़ी, पर बची नहीं... डॉक्टरांचे काम बंद आंदोलन; अधिकाऱ्यांचाही इशारा