मनोरंजन

Bigg Boss Marathi 5: "ज्याला बोलण्याचं भान नाही..."; पहिल्याच 'भाऊच्या धक्क्या'वर रितेश देशमुखने निक्कीला धरलं धारेवर

सुपरस्टार रितेश देशमुखने 'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनमधील पहिल्याच 'भाऊच्या धक्क्यावर' निक्की तांबोळीसह इतर सदस्यांची शाळा घेताना दिसून येणार आहे.

Tejashree Gaikwad

Bigg Boss Marathi New Season : "बिग बॉस मराठी'च्या घरात ज्याला बोलण्याचं भान नाही, त्याला इथे स्थान नाही", असं म्हणत सुपरस्टार रितेश देशमुखने 'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनमधील पहिल्याच 'भाऊच्या धक्क्यावर' निक्की तांबोळीसह इतर सदस्यांची शाळा घेताना दिसून येणार आहे. पहिल्याच आठवड्यात काहींच्या तोडंचं पाणी पळालं तर काहींच्या काळजाचं पाणीपाणी झालं. रितेशच्या या 'भाऊच्या धक्क्या'वर घरातील उद्धट सदस्यांचा पाणउतारा केला जाणार आहे.

'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनचा पहिला आठवडा निक्की तांबोळीने चांगलाच गाजवला. 'बिग बॉस मराठी'च्या घराला कंट्रोल करताना निक्की दिसून आली. आपल्या हिंमतीने आणि डोक्याने तिने अनेक गोष्टी केल्या. पण मुद्दा बरोबर असला तरी तिची भाषा चुकीची होती. त्यामुळे रितेश भाऊ त्याच्या 'भाऊच्या धक्क्या'वर तिचा माज उतरवणार आहे.

निक्की तांबोळी 'बिग बॉस मराठी'च्या घरात अभिनेत्री वर्षा उसगांवकरांचा अनादर करताना दिसून आली. त्यामुळे रितेश भाऊ निक्कीची चांगलीच शाळा घेणार आहे. रितेश देशमुख निक्कीला म्हणाला,"वर्षां ताईंसोबत ज्या भाषेत तुम्ही बोलता ती भाषा मी खपवून घेणार नाही.. त्यांचं कतृत्व, काम याचा रिस्पेक्ट झालाच पाहिजे. तुमचा उद्धटपणा महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात आणि प्रत्येक मराठी माणसापर्यंत पोहोचला आहे. कारण तुम्ही थेट मराठी माणसाच्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करुन त्या मराठी माणसाचा अपमान केलाय."

रितेश पुढे म्हणाला,"'बिग बॉस मराठी'च्या घरात ज्याला बोलायचं भान नाही..त्याला इथे स्थान नाही. महाराष्ट्र ठरवणार कोण घरात आणि कोण घराबाहेर जाणार? 'बिग बॉस मराठी'च्या ट्रॉफीवर तुमचं नाव कोरलं जाणार की नाही हेदेखील मराठी माणसंचं ठरवणार".

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी