मनोरंजन

Bigg Boss Marathi 5: "जिथं अत्याचार होणार तिथं सूरज उभा राहणार" सुरजने आर्याला दिला खंबीर पाठिंबा

Suraj Chavan: सुरुवातीला खूप शांत असलेल्या सुरजला आता हळूहळू 'बिग बॉस मराठी'चा खेळ कळू लागला आहे.

Tejashree Gaikwad

Bigg Boss Marathi New Season: 'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन सुरू होऊन २५ दिवस पूर्ण झाले आहेत. सीझन सुरू झाल्यापासूनचा प्रत्येक दिवस हा खूप खास आहे. प्रत्येक सदस्याने आपला वेगळा चाहतावर्ग निर्माण केला आहे. गोलीगत सूरज चव्हाण सुरुवातीला खूप शांत होता. पण आता हळूहळू त्याला 'बिग बॉस मराठी'चा खेळ कळू लागला आहे. 'बिग बॉस मराठी'च्या घरात जिथे चुकीचं होणार तिथे सूरज चव्हाण उभा राहणार आहे.

'बिग बॉस मराठी'चा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये सूरज चव्हाण अभिजीत सावंत आणि आर्या जाधवला म्हणत आहे,"जिथे अत्याचार होणार तिथे सूरज चव्हाण उभा राहणार... बोलत नाहीना म्हणून ते असा गरीबांचा फायदा घेतात. निक्कीने केलं की आपण ते सहन करायचं? आणि तेच आर्याने केलं तर? आपल्या ग्रुपमधलं कोणीही असो त्याला पाठिंबा द्यायचा म्हणजे द्यायचा..तू नड".

'बिग बॉस' खतरनाक आहेत- अरबाज पटेल

'बिग बॉस मराठी'च्या आजच्या भागात अरबाज पटेल म्हणत आहे,"बिग बॉस' खतरनाक आहेत. माझ्या कॅप्टनसीमध्ये डिलेमा दिलाय त्यांनी. कॅप्टनसी बरोबर सुरू होती. इम्युनिटी हा सर्वात मोठा प्रश्न होता. या इंडस्ट्रीत मी नवीन आहे". त्यावर अंकिता म्हणते,"मला प्रामाणिकपणे तुझा खेळ वीक वाटत नाही. मला वैभवचा खेळ वीक वाटतो".

महायुतीच्या गोंधळात निवडणूक आयोगाची भर!

डिसेंबर महिना कसा जाईल? बघा सिंह आणि कन्या राशीचे भविष्य

आजचे राशिभविष्य, ३ डिसेंबर २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

केंद्र सरकारचा निर्णय : पंतप्रधान कार्यालयाचे नामकरण; 'सेवा तीर्थ' अशी नवी ओळख

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनासाठी राज्य सज्ज; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कामकाजाचा आढावा