मनोरंजन

Bigg Boss Marathi : चकवा देणार, दार उघडणार, नशिबाचा गेम पालटणार! रितेश भाऊंच्या नव्या प्रोमोने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

कार्यक्रमाच्या सहाव्या सीझनची जोरदार चर्चा असताना कार्यक्रमाच्या थीम विषयी कल्पना देणारा आणि मूड सेट करणारा बहुप्रतिक्षित प्रोमो समोर आला आहे. त्यावरून प्रेक्षकांनी अनेक अंदाज बांधायला सुरुवात केले असून यंदाचा खेळ केवळ मनोरंजनापुरता मर्यादित नसून सदस्यांचे नशिब बदलणारा असल्याचं स्पष्ट दिसत आहे.

Krantee V. Kale

मुंबई : “यंदाचा खेळ सगळ्यांना चकवा देणार, बिग बॉस मराठीचं दार उघडणार, नशिबाचा गेम पालटणार!” या कॅप्शनसह बिग बॉस मराठीचा नवा प्रोमो व्हिडिओ सोशल मीडियावर जारी करण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या सहाव्या सीझनची जोरदार चर्चा असताना कार्यक्रमाच्या थीम विषयी कल्पना देणारा आणि मूड सेट करणारा बहुप्रतिक्षित प्रोमो समोर आल्याने प्रेक्षकांनी अनेक अंदाज बांधायला सुरुवात केले असून यंदाचा खेळ केवळ मनोरंजनापुरता मर्यादित नसून सदस्यांचे नशिब बदलणारा असल्याचं स्पष्ट दिसत आहे.

“फॅन्सचा जीव जडला, की ते पाठ नाही सोडत… आणि आपण शब्द दिला की मागे नाही हटत…” अशा कडक शब्दांत अभिनेता रितेश देशमुखनी या सीझनचा बार उडवला आहे. नक्की दारा पलीकडे काय ट्विस्ट असणार? ? सदस्यांना हे सगळं कसं नव्या पेचात टाकणार? कोण होणार पास तर कोण होणार फेल? या सगळ्याची उत्तरं दार उघडल्यावरच मिळणार आहेत.

यंदा नवीन काय?

प्रोमो रिलीज होताच त्याचं प्रमुख आकर्षण ठरतंय रितेशचे कोड्यातून गेम व घराची थीम सांगणारे प्रभावी संवाद. प्रत्येक प्रोमोमध्ये प्रेक्षकांसाठी काहीतरी नवं असतं. कधी सरप्राइझ, नवा लूक, वेगळी स्टाईल, खास स्वॅग हे प्रोमोचं कायमचं वैशिष्ट्य राहिलं आहे. यंदाही तसंच काहीसं घडले आहे. या प्रोमोमध्ये यंदाच्या सीझनची थीम वेगळ्या पद्धतीतून प्रेक्षकांसमोर आणण्याकरीता भाऊ आपल्या एका हटके लूकमध्ये दिसत असून, या सिझनची टॅगलाईन “दार उघडणार, नशिबाचा गेम पालटणार!” सुद्धा प्रभावीप्रमाणे प्रेक्षकांसमोर आणली आहे. या सिझनचा खेळ महाराष्ट्राला खिळवून ठेवणार हे नक्की. "ह्याला प्रेम म्हणा नाहीतर वेड, चकवा देणार यंदाचा खेळ" रितेश देशमुखच्या या ओळींना सोशल मीडियावर चांगला प्रतिसादही मिळण्याची चिन्हे आहेत. रितेश भाऊंचा कडक अंदाज, प्रोमोमधील संवाद यंदाच्या सिझनचा ‘मूड सेटर’ करणारे आहेत.

घराची भव्य रचना, शेकडो दारखिडक्यांनी सजलाय घराचा जंगी थाट..दारापल्याडचं surprise…..ठरवेल प्रत्येकाची वाट; यामुळे प्रत्येक क्षणी खेळाचा डाव बदलू शकतो, असा ठाम इशारा हा प्रोमो देतो. त्यामुळे घर नक्की कसं दिसणार? नक्की काय सरप्राइझेस असणार? आणि क्षणात डाव कसा बदलणार? हे प्रश्न सध्या प्रेक्षकांमध्ये चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहेत.

बघा व्हिडिओ -

बिग बॉस मराठी सिझन ६, ११ जानेवारीपासून सुरू होणार आहे.

IIT बॉम्बेतील साहिल वाकोडे आत्महत्येप्रकरणी प्राध्यापक निलंबित; 'त्या' निवेदनावरून संस्थेची माफी

Mumbai : ‘बटरफ्लाय’ रोखणार पाणी गळती; जलवाहिन्यांवर बटरफ्लाय झडपा बसवणार, गणेश खणकर यांच्या मागणीची दखल

Mumbai : चौपाटी, विसर्जनस्थळी चोख व्यवस्थापन; देशभरातील तज्ज्ञांकडून पालिका, पोलिसांचे कौतुक

गणेश विसर्जनासाठी BMC सज्ज; ३८३ कृत्रिम तलावांची व्यवस्था, ६७ नैसर्गिक विसर्जनस्थळांवरही सुविधा, २५ हजार अधिकारी-कर्मचारी तैनात

बार्सिलोनामध्ये ‘गणपती बाप्पा मोरया’; महाराष्ट्र मंडळ स्पेनतर्फे गणेशोत्सव, स्पॅनिश कलाकारांचाही सहभाग