Instagram
मनोरंजन

Babu: राडा करायला येतोय,'बाबू नाय, बाबू शेठ'! पहिला मराठी आगरी कोळी भाषेतील चित्रपट

Upcoming Marathi Movie: अस्सल आगरी कोळी भाषेत पहिला मराठी चित्रपट बाबू- 'बाबू नाय, बाबू शेठ’ लवकरच चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Tejashree Gaikwad

Ankit Mohan: अस्सल आगरी कोळी भाषेत आपला जलवा दाखवाणारा स्टायलिश ‘बाबू’ २ ॲागस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘बाबू नाय, बाबू शेठ…’ असणाऱ्या ‘बाबू’ची स्टाईलच निराळी असून बाबूची भूमिका साकारणारा अंकित मोहन या चित्रपटात एका वेगळ्याच भूमिकेत दिसणार आहे. ‘बाबू’ची ही झलक नुकतीच सोशल मीडियावर झळकली असून आता प्रेक्षक आता या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत.

मोशन पोस्टर पाहूनच हा ॲक्शनपट असल्याचा अंदाज रसिकवर्गाला आला असेल. श्री समर्थ कृपा प्रोडक्शन प्रस्तुत 'बाबू' या चित्रपटाची निर्मिती सुनीता बाबू भोईर, बाबू कृष्णा भोईर यांनी केली आहे. तर या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा मयूर मधुकर शिंदे यांनी सांभाळली आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शक मयूर मधुकर शिंदे म्हणाले, "मराठी चित्रपटात भावनिकता, विनोद, कमाल कथा या सगळ्यांचा समावेश असतोच परंतु 'बाबू' चित्रपटातून जबरदस्त ॲक्शन, स्टाईल, यांचा धमाकेदार संगम प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. त्यात अंकित मोहन सारखा जबरदस्त हिरो असल्याने हा ‘बाबू’ अधिकच रंगला आहे.

शिवरायांचे किल्ले ‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळ यादीत

मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याचा कॅनडातील कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार

सरकारची इलेक्ट्रिक ट्रक प्रोत्साहन योजना सुरू; PM e-Drive अंतर्गत ९.६ लाख रु.मिळणार

टेस्ला पुढील आठवड्यात भारतात प्रवेश करण्यास सज्ज; वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये पहिले शोरूम सुरू करणार

अजित पवारांची माफी मागा! लक्ष्मण हाके यांना राष्ट्रवादीची नोटीस