अॅक्शन हिरो सनी देओलचा 'गदर २'हा सिक्वेलपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकुळ घालत आहे. या सिनेमाने अनेक सिनेमांचे रेकॉर्ड तोडण्याचा धडाकाच लावला आहे. रिलीज झाल्यानंतर आठ दिवसातच या सिनेमाने ३०० कोटींची गल्ला जममवला आहे. 'गदर २' या चित्रपटाला पाकिस्ताना मात्र बंदी घातली आहे. दुसरीकडे सनी देओलच्या मुंबईतील बंगल्याचा लिलाव होणार आहे. 'गदर २'ने कॉट्यावधी रुपयांची कमाई केल्यानंतरही सनी देओल त्यावरील कर्जाची परतफेड करु शकला नाही. त्यामुळे आता त्यांचा बंगल्याचा लिलाव केला जाणार आहे.
का होणार बंगल्याचा लिलाव?
सनीच्या मुंबईतील जुहू येथील बंगल्याचा लिलाव होणार आहे. बँक बडोदाने बंगल्याची ई-लिलाव अधिसुचना जारी केली आहे. सनीने हा बंगला गहाण ठेवला होता. त्याला ५६ कोटी रुपये बँकेत भरायचे होते. पण, सनीने या पैशाची परतफेड केलेली नाही. त्यामुळे येत्या २५ सप्टेंबरला त्यांच्या बंगल्याचा लिलाव होणार असल्याची अधिसुचना बँक ऑफ बडोदाने काढली आहे.
पाकिस्तानात बंदी का?
अभिनेता सनी देओल आणि त्यांच्या सिनेमांना पाकिस्तानात बंदी घालण्यात आली आहे. सनी देओलने देशप्रमावर अनेक सिनेमे केले आहेत. त्यात त्याने पाकिस्ताचा विरोध करणाऱ्या अनेक भूमिका साकारल्या आहेत. यामुळे या सिनेमाचे शो न दाखवण्याचा निर्णय पाकिस्तान सरकारने घेतला आहे.
'गदर २'ची घोडदौड सुरुच
२००१ साली आलेल्या 'गदर - एक प्रेम कथा' या सिनेमाने चांगलाच धुमाकुळ घातला होता. या चित्रपटात सनीने साकारलेली तारा सिंगची भूमिका चांगलीच गाजली. भारतीयांनी तारासिंहला डोक्यावर घेतलं असलं तरी पाकिस्तानी सिनेरसिकांना मात्र त्याचं काम आवडलं नाही. तसंच सनीने 'गदर - एक प्रेम कथा', 'बॉर्डर', 'द हिरो', 'माँ तुझे सलाम', या सिनेमात पाकिस्तानच्या विरोधात भूमिका साकारल्या आहेत.