मनोरंजन

भारतीय अभिनेत्याचं के-पॉप कनेक्शन !

भारतीय आणि कोरियन संस्कृतीची अनोखी सांगड

नवशक्ती Web Desk

के-पॉप हे त्यांच्या हटके याच्या बीट्स, जगभरातील फॅनक्लबसाठी ओळखले जाते. के पॉप सध्या जागतिक संगीताला एक अनोखं स्थान प्रस्थापित करून देत आहे. दक्षिण कोरियाचा सांस्कृतिक अविभाज्य घटक असलेल्या के पॉप च्या सर्वदूर चर्चा आहेत. के-पॉपच्या फ्युजन आता सगळ्यांना अनुभवयाला मिळणार आहे , कारण भारतीय अभिनेता प्रतीक सहजपाल के-पॉप सेन्सेशन आओरासोबत एक भन्नाट कोलॅब करणार असल्याचं समजतंय.

प्रतिक सहजपाल लिखित आणि दिग्दर्शित हा खास प्रोजेक्ट् नक्कीच काहीतरी वेगळं असणार आहे. के-पॉप चा अनोखा उत्साह आता भारतीयांना देखील अनुभवयाला मिळणार आहे.. प्रतीक सहजपालच्या आओरासोबतच्या या खास प्रोजेक्ट च्या घोषणेने चाहत्यांमध्ये आणि इंडस्ट्रीत उत्साह बघायला मिळतोय. प्रतीकने या टीझर ची एक झलक सोशल मीडिया वर शेअर केलीय. " Let it begin " असं लिहीत त्यानं हा खास व्हिडिओ जगासमोर आणलाय.

के-पॉप सोबतचा प्रतीकचा हा अनोखा प्रोजेक्ट नक्कीच वेगळा असणार यात शंकाच नाही. प्रतीक सहजपाल आणि आओरा यांच्या कलांची अनोखी सांगड यातून अनुभवयाला मिळणार आहे.

गणपती गेले गावाला...! 'पुढच्या वर्षी लवकर या'चा घुमला जयघोष; दहा दिवसांच्या गणेश मूर्तीचे उत्साहात विसर्जन

Maharashtra : बाप्पाच्या निरोपावेळी दुर्दैवी घटना; राज्यात ७ जणांचा मृत्यू

मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देणारा गजाआड; गोंधळ माजवण्यासाठी पाठवला संदेश

भारतासोबतचे संबंध पुन्हा स्थापित करण्यास तयार! ट्रम्प यांना आली उपरती; मोदींकडून ट्रम्प यांच्या विचारांचे कौतुक

अंजना कृष्णा धमकी प्रकरणात बावनकुळे यांचे अजितदादांना समर्थन