मनोरंजन

"परवानगीशिवाय माझा चेहरा वापरलाय" ; काँग्रेसच्या ‘मत चोरी’ जाहिरातीवर के. के. मेनन संतापला

कॉँग्रेसच्या 'मत चोरी' मोहिमेमध्ये आपला कोणताही सहभाग नसल्याचे बॉलीवूड अभिनेता के. के. मेनन याने स्पष्ट केले आहे. कॉँग्रेसने 'मत चोरी' या मोहिमेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध केला.

Mayuri Gawade

कॉँग्रेसच्या 'मत चोरी' मोहिमेमध्ये आपला कोणताही सहभाग नसल्याचे बॉलीवूड अभिनेता के. के. मेनन याने स्पष्ट केले आहे. कॉँग्रेसने 'मत चोरी' या मोहिमेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध केला. या व्हिडिओमध्ये के के मेननची एक लहानशी क्लिप असून कॉँग्रेसचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याने या संदर्भात सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली आहे.

काँग्रेसच्या ‘मत चोरी’ मोहिमेतील व्हिडिओ

काँग्रेसच्या ‘मत चोरी’ मोहिमेचा एक व्हिडिओ त्यांनी आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवर पोस्ट केला आहे. या व्हिडिओच्या सुरुवातीला के. के. मेनन दिसतात आणि लोकांचं लक्ष वेधण्यासाठी म्हणतात, "अरे थांबा-थांबा यार, स्क्रोल करणं थांबवा, जर तुम्ही ही रील पाहत असाल तर..." त्यानंतर दुसरा व्यक्ती मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन करताना दिसतो. कॅप्शनमध्ये लोकांना लिंक व नंबर देऊन फॉर्म भरायला आणि कॉल करण्याचं आवाहन व्हिडिओमध्ये केले आहे.

“मी या जाहिरातीत काम केलं नाही” - के. के. मेनन

हा व्हिडिओ पाहून अनेकांना वाटलं की के. के. मेनन काँग्रेसच्या या मोहिमेत आहेत. पण मेनन यांनी लगेचच पोस्टच्या कमेंट सेक्शनमध्ये स्पष्टीकरण देत लिहिलं - "कृपया लक्षात घ्या, मी या जाहिरातीत अभिनय केलेला नाही. माझ्या ‘स्पेशल ऑप्स’ प्रमोशनमधील एक क्लिप एडिट करून, माझ्या परवानगीशिवाय या मोहिमेत वापरली गेली आहे."

इनस्टाग्रामवरील हा व्हिडिओ जरी काँग्रेसच्या 'मत चोरी' मोहिमेचा भाग असला, तरी के. के. मेनन यांच्या म्हणण्यानुसार त्यांचा या मोहिमेशी काहीही संबंध नाही.

Mumbai : ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक वेशभूषा अन् नववर्षाचा जल्लोष; मुंबई, ठाणे, डोंबिवलीत गुढीपाडव्याच्या भव्य शोभायात्रा

Air Travel Alert : प्रवाशांनो लक्ष द्या! 'या' ४ विमानतळांवर बंदी; फ्लाइट्सवर होणार परिणाम

अक्षय्य तृतीयेपूर्वी सोन्याचे दर वाढण्याची शक्यता; ग्राहकांच्या खरेदी धोरणावर परिणाम होणार

Nagpur : मॅट्रिमोनियल साईटवरील ओळख महागात पडली; मॉर्फ अश्लील व्हिडिओने ३६ वर्षीय व्यक्तीला ब्लॅकमेल

भिवंडीत फर्निचर मार्केटला भीषण आग; अनेक दुकाने जळून खाक, सुदैवाने जीवितहानी टळली