Possible list of Bigg Boss OTT 3 Contestants  Instagram
मनोरंजन

Bigg Boss OTT 3 Contestants: दिल्लीची व्हायरल वडापाव गर्ल दिसणार बिग बॉसच्या घरात? जाणून घ्या संभाव्य लिस्ट

Contestants List of Bigg Boss OTT 3: रिॲलिटी शो 'बिग बॉस ओटीटी' तिसऱ्या सीझनसह प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. यंदाच्या सीजनमध्ये कोण कोण झळकणार याच्या नावांची चर्चा होत आहे.

Tejashree Gaikwad

Jio Cinema, Anil Kapoor: बिग बॉस ओटीटी सीजन ३ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सर्वत्र याची चर्चा सुरु आहे. अनिल कपूर यंदाच्या सिजनचे नवीन होस्ट म्हणून निश्चित झाल्यापासून, चाहते शोमध्ये कोण भाग घेणार याची वाट पाहत आहेत. हा रिअल लाइफ ड्रामा शो २१ जूनपासून जीव सिनेमावर सुरू होणार आहे. या शोमध्ये स्पर्धक म्हणून कोण येणार याबद्दल मनोरंजन विश्वातील काही लोकप्रिय नावांची चर्चा होत आहे. यंदा शोमध्ये दिल्लीची व्हायरल वडा पाव गर्ल चंद्रिका दीक्षित स्पर्धक म्हणून दिसणार असल्याची चर्चा रंगली आहे.

यंदाच्या सिजनमध्ये कोणकोण झळकणार?

माहितीनुसार, 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेतील अभिनेता हर्षद चोप्रा आणि शहजादा धामी यांची बिग बॉस ओटीटी ३ साठी निवड झाली आहे. या दोन नावांव्यतिरिक्त, 'टेम्पटेशन आयलंड' या रियालिटी शोची विजेते चेष्टा भगत आणि निखिल मेहता हे देखील चर्चित स्पर्धकांच्या नावांच्या यादीत आहेत. सोशल मीडिया सेन्सेशन विशाल पांडे आणि वडा पाव गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेल्या चंद्रिका दीक्षित हे सुद्धा घरात एन्ट्री घेतील अशी चर्चा आहे. याशिवाय घरात सरप्राईज एंट्रीसाठी निर्माते बॉलीवूडच्या एका लोकप्रिय स्टारशीही चर्चा करत असल्याची माहिती मिळत आहे.

हे ही वाचा

युटूबरची नावे चर्चेत

या सर्व नावांसोबत, युटूबर अभि आणि नियू हे देखील अनिल कपूरने होस्ट केलेल्या रिॲलिटी शोमध्ये सहभागी होण्याची अपेक्षा आहे. या आधीचा बिग बॉस ओटीटीचा सीजन युटूबर्सने गाजवल्यामुळे या नावाची जोरदार चर्चा आहे.

'मिका सिंग'चीही होऊ शकते घरात एन्ट्री

फ्री प्रेस जर्नला मिळालेल्या एक्सक्लूसीव माहिती नुसार बिग बॉस ओटीटी च्या आगामी सीझनसाठी मिका सिंगलाही संपर्क केल्याची माहिती मिळाली आहे.

हे ही वाचा

अनिल कपूर करणार शो होस्ट

रिॲलिटी शो 'बिग बॉस ओटीटी' तिसऱ्या सीझनसह प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. यंदा बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अनिल कपूर हा शो होस्ट करणार आहेत. सोमवारी, निर्मात्यांनी शोचा नवीन प्रोमो रिलीज केला आहे. ज्यामध्ये अनिल कपूर चाहत्यांना खात्री देताना दिसत आहेत की या सीजनमध्ये खूप मज्जा येणार आहे.

संभाव्य लिस्ट मधील नावं कन्फर्म झाल्यास यंदाचा सीजन फारच रंगेल असं वाटतं आहे.

विरार-अलिबाग अंतर दोन तासांत पार होणार; मल्टिमॉडेल मार्गिकेला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

मराठा आंदोलनाचा विजय! अखेर मनोज जरांगे-पाटलांनी पाचव्या दिवशी उपोषण सोडले; राज्य सरकारकडून ८ पैकी ६ मागण्या मान्य

घटनेतील तरतुदींचे स्पष्टीकरण करणार, सर्वोच्च न्यायालयाची माहिती; राष्ट्रपती, राज्यपालांवर विधेयकावर कालावधीचे बंधन

चीनकडून भव्य लष्करी संचलनात अत्याधुनिक शस्त्रांचे आज प्रदर्शन

GST परिषदेची आज बैठक; दैनंदिन वापरातील वस्तूंवरील कर कमी होण्याची शक्यता