मनोरंजन

Jackie Shroff: सर्वांवर होईल कारवाई, फक्त कृष्णा अभिषेकला मिळाली सूट! जग्गूदादाची मिमिक्री करु शकतो कॉमेडियन

Krushna Abhishek: जॅकी श्रॉफ यांनी यावर्षी दिल्ली उच्च न्यायालयात त्यांचे नाव, फोटो, आवाज आणि 'भिडू' शब्द वापरण्याबाबत एक याचिका दाखल केली होती.

Tejashree Gaikwad

Jackie Shroff: बॉलिवूडचे जेष्ठ अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी यावर्षी दिल्ली उच्च न्यायालयात त्यांचे नाव, फोटो, आवाज आणि 'भिडू' शब्द वापरण्याबाबत एक याचिका दाखल केली होती. या याचिकेवर कोर्टाने जॅकी श्रॉफ यांच्या बाजूने निकाल दिला होता. तेव्हापासून अभिनेत्याचे नाव, फोटो आणि संवाद वापरणे बेकायदेशीर झाले आहे. परंतु न्यायालयाच्या आदेशानंतरही प्रसिद्ध कॉमेडियन अभिनेता कृष्णा अभिषेकला जग्गू दादाचा मिमिक्री करण्याची परवानगी मिळालीये. स्वतः कृष्णानेच याबाबतचा खुलासा नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत केला आहे. 'त्यांना मी केलेली त्यांची मिमिक्रीही आवडते आणि ते त्याचा मनमुराद आनंदही लुटतात', असंही कृष्णाने सांगितले आहे.

कृष्णा अभिषेकने इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला की, जॅकी श्रॉफ यांनी स्वत: त्याच्याशी संपर्क साधला. यावेळी त्यांनी कृष्णाच्या अभिनयाचे कौतुक केले. यासोबतच केवळ कृष्णालाच त्यांची मिमिक्री करण्याची परवनगी आहे आणि एवढेच नव्हे तर त्याच्यावर यासाठी कोणतीही कायदेशीर कारवाई होणार नाही असेही त्याला सांगितले. "जॅकी श्रॉफ यांना मी केलेली मिमिक्री आवडते आणि त्यांनी मला वैयक्तिकरित्या फोन केला होता...कायदेशीर बाब तुझ्यावर लागू होत नाही, असेही त्यांनी सांगितले" असे कृष्णा म्हणाला.

यावेळी कृष्णाने स्वतःच्या आगामी सिनेमाबाबतही सांगितले. वेलकम टू द जंगलमध्ये तो झळकणार असून यामध्ये जॅकी श्रॉफ देखील त्याच्यासोबत दिसतील. जॅकी श्रॉफ यात खलनायकाची भूमिका करत आहेत. 'सेटवर आम्ही खूप छान वेळ घालवला. ब्रेकमध्ये दादा मला माझ्या अभिनयाचे व्हिडीओ दाखवायला सांगायचे आणि ते बघून एन्जॉय करायचे', असेही त्याने सांगितले.

जॅकी श्रॉफ यांची दिल्ली उच्च न्यायालयात धाव

जॅकी श्रॉफ यांनी २०२४मध्ये त्यांनी त्यांचे व्यक्तिमत्व आणि प्रसिद्धी हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. संमतीशिवाय नाव, छायाचित्रे, आवाज आणि "भिडू" या शब्दाचा कथित 'अनधिकृत' वापर केल्याबद्दल जॅकी श्रॉफ यांनी दिल्ली उच्च न्यायालयात अनेक संस्थांविरुद्ध खटला दाखल केला होता. त्यावर न्यायालयाने सर्व पक्षांचे म्हणणे ऐकून घेत अभिनेत्याच्या बाजूने निकाल दिला होता.

आता कोर्टाच्या आदेशानुसार जॅकी श्रॉफ यांच्या परवानगीशिवाय त्याचे नाव कोणत्याही व्यासपीठावर वापरले जाऊ शकत नाही.

अदानी पुन्हा गोत्यात; सौरऊर्जा कंत्राट मिळविण्यासाठी दिली 2000 कोटींची लाच, अमेरिकेतील कोर्टात आरोप

मुख्यमंत्रीपदावरून रणकंदन! महायुतीत फडणवीस, शिंदे, अजित पवारांच्या नावाचे दावे

अपक्ष, बंडखोरांवर सत्ता स्थापनेची मदार; महायुती व मविआची जोरदार मोर्चेबांधणी

रशियाचा युक्रेनवर आंतरखंडीय क्षेपणास्त्राने हल्ला

कोल्हापूरच्या चेतन पाटीलला जामीन मंजूर; जयदीप आपटेच्या जामिनावर सोमवारी सुनावणी