मनोरंजन

Kshitish Date: मराठमोळ्या क्षितीश दातेचं 'मिस्त्री' मधून बॉलिवूड वेबविश्वात पदार्पण; प्रेक्षकांचं भरभरून कौतुक

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता क्षितीश दाते आता हिंदी वेब विश्वात आपला नवा प्रवास सुरु करत आहे. ‘मिस्त्री’ या वेबशोतील त्याची भूमिका प्रेक्षकांना आकर्षित करत आहे.

Mayuri Gawade

मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाची ठसठशीत छाप सोडणारा अभिनेता क्षितीश दाते आता थेट बॉलिवूड वेबविश्वात एंट्री करत आहे. 'हॉटस्टार'वरील 'मिस्त्री' या नव्या वेबशोमधून त्याने हिंदी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं असून, यात त्याने पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. 'बंटी' असं त्याच्या पात्राचं नाव असून त्याने ही व्यक्तिरेखा गंभीर, पण थोड्या विनोदी शैलीत रंगवली आहे.

हिंदी दिग्गजांसोबत स्क्रीन शेअर

राम कपूर, मोना सिंग आणि शिखा यांसारख्या दिग्गज कलाकारांसोबत स्क्रीन शेअर करताना क्षितीश पूर्ण आत्मविश्वासाने झळकत आहे. आपला अनुभव शेअर करताना त्याने म्हंटले की, “खाकी घालून अभिनय करणं आणि तेही अशा मोठ्या टीमसोबत, हा माझ्यासाठी वेगळा अनुभव ठरला. वेब शोमध्ये बॉलिवूडसारख्या प्लॅटफॉर्मवर काम करणं, ही माझ्यासाठी शिकवण होती.”

प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली भूमिका

'धर्मवीर', 'मुळशी पॅटर्न', 'फुलवंती', 'मी vs मी' अशा वेगवेगळ्या चित्रपट, नाटकांमधून प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या क्षितीशने या नव्या भूमिकेतही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘मिस्त्री’ वेबशोचं कथानक थोडं गूढ आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीवर आधारित असलं तरी त्यामधील क्षितीशची हलकीफुलकी पण परिणामकारक भूमिका विशेष लक्ष वेधून घेत आहे.

‘मिस्त्री’ सध्या हॉटस्टारवर स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध आहे. क्षितीशचा वेगळा अंदाज पाहायचा असेल तर ही वेबसीरिज नक्की बघा!

औरंगाबाद रेल्वे स्टेशन आता 'छत्रपती संभाजीनगर'

पाकिस्तानचा इंच न इंच भूभाग 'ब्रह्मोस'च्या टप्प्यात; संरक्षण मंत्र्यांचा इशारा

IND vs AUS : रोहित, विराटसह गिलच्या नेतृत्वाची परीक्षा; भारत-ऑस्ट्रेलिया एकदिवसीय मालिका आजपासून

Women’s World Cup : गोलंदाजीत सुधारणा करण्याचे आव्हान; भारताची आज इंग्लंडशी गाठ

आजचे राशिभविष्य, १९ ऑक्टोबर २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत