शाहरूख खान  संग्रहित छायाचित्र
मनोरंजन

शाहरूख खान धमकी प्रकरणात वकिलास अटक

बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान याला ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी मंगळवारी छत्तीसगडची राजधानी असलेल्या रायपूरमधून एका वकिलास अटक केल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

Swapnil S

मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान याला ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी मंगळवारी छत्तीसगडची राजधानी असलेल्या रायपूरमधून एका वकिलास अटक केल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबई पोलीस गेल्या गुरुवारी रायपूरला यासंदर्भातील तपासासाठी गेले होते आणि त्यांनी व्यवसायाने वकील असलेल्या फैझन खान याला चौकशीसाठी बोलाविले होते. फैझन खान याला पांडरी पोलीस ठाणे परिसरातून अटक करण्यात आल्याचे असल्याचे मुंबई पोलिसांनी मंगळवारी सकाळी रायपूर पोलिसांना सांगितले.

फैझन खान याच्या नावावर नोंदणी करण्यात आलेल्या भ्रमणध्वनीवरून शाहरूख खान याला धमकी देण्यात आली होती असे प्राथमिक तपासामध्ये आढळले आहे. मात्र आपला भ्रमणध्वनी चोरील गेला असून त्याबाबत पोलिसांकडे तक्रार नोंदविण्यात आली असल्याचे फैझन याने चौकशीदरम्यान सांगितले. मुंबई पोलिस फैझनला रायपूर न्यायालयात हजर करणार असून त्याच्या ट्रान्झिट रिमांडची मागणी करणार आहेत.

मुंबईसह २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा; आजपासून आचारसंहिता लागू

BMC Election : २२७ जागांसाठी मुंबईत मतदान; महापालिका निवडणुकांची अधिसूचना जाहीर

'नाव बदलणे ही लाजिरवाणी गोष्ट...'; ‘विकसित भारत’च्या नावाखाली MGNREGA च्या नावात बदल केल्याने विरोधक आक्रमक

कल्याणमध्ये रॅपिडो चालकाचा धक्कादायक प्रकार; विनयभंगाच्या प्रकरणानंतर रॅपिडो, ओला आणि उबरवर टांगती तलवार

‘वोट चोर, गद्दी छोड़’ रॅलीवरून संसदेत गोंधळ; दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब, भाजपचा तीव्र आक्षेप