मनोरंजन

Adipurush : रामनवमीच्या मुहूर्तावर 'आदिपुरुष' चित्रपटाचा पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला

मात्र अखेर हा चित्रपट 16 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातील सैफच्या लूकमुळे वाद निर्माण झाला होता

नवशक्ती Web Desk

आज रामनवमी उत्साहात साजरी केली जात आहे. आज रामनवमीच्या दिवशी प्रभासच्या आदिपुरुष या चित्रपटाचे नवे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. दिग्दर्शक ओम राऊत यांनी आदिपुरुष चित्रपटाची ही नवीन पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. या पोस्टरने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. ओम राऊत यांनी शेअर केलेल्या आदिपुरुष चित्रपटाच्या पोस्टमध्ये प्रभास श्री रामाच्या भूमिकेत दिसत आहे, तर क्रिती सेनॉन सीतेच्या भूमिकेत दिसत आहे. आदिपुरुष या चित्रपटात मराठमोळा अभिनेता देवदत्त नागे रामभक्त हनुमानाची भूमिका साकारतोय. लक्ष्मणची भूमिका अभिनेता सनी सिंग करत आहे. ओम राऊतसोबतच क्रिती, प्रभास, देव दत्त आणि सनी सिंग यांनीही आदिपुरुष चित्रपटाची ही नवीन पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. मंत्रों से बढके तेरा नाम, जय श्री राम' असे त्यांनी या पोस्टरला कॅप्शन दिले आहे.  

आदिपुरुष चित्रपट 16 जून रोजी प्रदर्शित असून 'आदिपुरुष' चित्रपटाची निर्मिती 500 कोटींच्या बजेटमध्ये करण्यात आली. आदिपुरुष हा हिंदी, तमिळ, मल्याळम, कन्नड भाषांमध्ये प्रदर्शित होणारा चित्रपट आहे. प्रभासचा 'आदिपुरुष' याआधी 11 ऑगस्ट 2022 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार होता. पण काही कारणास्तव या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आल्यानंतर हा चित्रपट 2023 मध्ये प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र अखेर हा चित्रपट 16 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातील सैफच्या लूकमुळे वाद निर्माण झाला होता. 

शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे ? १४ जुलैला सुनावणी

माऊलींच्या पालखीत 'माऊली'चा अपमान; चोपदाराने वारकरी महिलेला दिलं ढकलून| Video

बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमावर मस्तानी यांच्या वंशजाचा बहिष्कार

कोकणातील कातळशिल्पांचे जतन करा; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

दीपिका पदुकोण 'हॉलिवूड वॉक ऑफ फेम'वर झळकणार; इतिहास रचणारी ठरली पहिली भारतीय अभिनेत्री