मनोरंजन

"अब रुल पुष्पा का" म्हणत पुष्पा - २चा उत्कंठावर्धक टिझर प्रदर्शित

"पुष्पा - दि राईस"च्या भव्य यशानंतर सर्वाना प्रतीक्षा होती ती "पुष्पा- दि रुल"च्या टीझरची

प्रतिनिधी

दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा 'पुष्पा - दि राईस' देशभरात चांगलाच प्रसिद्ध झाला होता. सर्वानीच या चित्रपटाला डोक्यावर घेतले होते. यानंतर याचा दुसरा भाग कधी येतो याकडे साऱ्यांचे लक्ष होते. अखेर याचा टिझर प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर चांगलाच ट्रेंड होत आहे. दरम्यान, हा टिझर येण्यापूर्वी आधी काही दिवशी पुष्पा तुरुंगातून पळाला, तो गेला कुठे असा एक छोटा टिझर प्रसिद्ध करण्यात आला होता. यानंतर सर्वांचे लक्ष या आगामी टिझरकडे लागले होते. यामध्ये अखेर पुष्पाचे दर्शन घडले आणि पुन्हा एकदा 'अब रुल पुष्पा का' म्हणत चाहत्यांमध्ये या चित्रपटाची उत्सुकता आणखी वाढवली आहे.

दरम्यान, अल्लू अर्जुनच्या पुष्पाच्या पहिल्या भागामध्ये 'मैं झुकेगा नहीं साला', 'फ्लावर नहीं फायर है' हे संवाद चांगलेच प्रसिद्ध झाले. याचसोबत या चित्रपटातील 'श्रीवल्ली', 'ए बिट्टा' सारख्या गाण्यांनी प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले. छोट्या शहरातील रस्त्यांपासून ते क्रिकेट स्टेडियम, राजकीय रॅली आणि कॉर्पोरेट बोर्ड रूम्सपर्यंत, त्याचे डायलॉग्स गाजले, ज्यामुळे पुष्पा पॉवरहाऊस भारतीय सामान्य लोकांचे प्रतीक बनला. इतकंच नव्हे, तर मुरादाबादमधील लग्नसोहळ्यात आणि इबीझामधील क्लबमध्येही चित्रपटाची गाणी वाजवण्यात आली. आयकॉनिक स्टार अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा'च्या वेधक अवताराने संपूर्ण देशाला चित्रपटासाठी एकजूट केले आणि त्या वर्षातील सर्वात मोठा चित्रपट बनला.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक