मनोरंजन

Rakhi Sawant : राखी सावंतला अटक ; काय आहे नेमकं कारण ?

आंबोली पोलिसांनी राखी सावंतला एफआयआर क्रमांक ८३३/२०२२ क्रमांक एफआरआय प्रकरणी अटक केली

प्रतिनिधी

अभिनेत्री राखी सावंतला आंबोली पोलिसांनी मुंबईत अटक केली आहे. राखी सावंतवर एका मॉडेलचा फोटो व्हायरल झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी तक्रारीची दखल घेत कारवाई केली. एका महिलेचा फोटो राखीने व्हायरल केला होता. या संदर्भात संबंधित मॉडेलने पोलिसांत तक्रार दाखल केली. याबाबतची माहिती अभिनेत्री शार्लिन चोप्राने ट्विटरवर दिली आहे. आंबोली पोलिसांनी राखी सावंतला एफआयआर क्रमांक ८३३/२०२२ क्रमांक एफआरआय प्रकरणी अटक केली. काल राखी सावंतने मुंबई सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, तो अर्ज न्यायालयाने फेटाळला,' असे शार्लिन चोप्राने ट्विटमध्ये म्हटले आहे. दरम्यान, राखी सावंतला लवकरच न्यायालयात हजर करण्यात येणार असून, त्यानंतर तिची पोलीस कोठडी की न्यायालयीन कोठडी याबाबतचे चित्र स्पष्ट होणार आहे. 

राखीने पत्रकार परिषदेत शार्लीन चोप्राचा आक्षेपार्ह व्हिडिओ दाखवून आक्षेपार्ह भाषेत वक्तव्य केल्याने राखीविरोधात तक्रार दाखल करण्यात आल्याचेही बोलले जात आहे. राखी सावंत गेल्या दोन दिवसांपासून तिच्या प्रेग्नेंसीमुळे चर्चेत होती. राखी गरोदर असल्याचं म्हटलं जात होतं. विरल भयानीनेही इन्स्टाग्रामवर पोस्ट करत राखी सावंत प्रेग्नंट असल्याचं म्हटलं होतं, नंतर ही पोस्ट हटवण्यात आली. 

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत