(Photo-Instagram)
मनोरंजन

सामंथाचा एलिगंट मॅटर्निटी लूक; पिवळ्या ड्रेसमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल

इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करताना सामंथाने आयुष्यातील बदलत्या टप्प्यांवर भाष्य करणारी भावनिक पोस्टही लिहिली.

किशोरी घायवट-उबाळे

अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू पुन्हा एकदा आपल्या एलिगंट मॅटर्निटी फॅशनमुळे चर्चेत आली आहे. प्रेग्नन्सीदरम्यानही स्टाइल आणि कम्फर्ट यांचा सुंदर समतोल साधत तिने मस्टर्ड यलो रंगाच्या ड्रेसमधील काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. विशेष म्हणजे, बेबी बंपला केंद्रस्थानी न ठेवता साधेपणातूनही आकर्षक फॅशन कशी करता येते, हे सामंथाने या लूकमधून दाखवून दिले.

भावनिक पोस्टने वेधले लक्ष

इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करताना सामंथाने आयुष्यातील बदलत्या टप्प्यांवर भाष्य करणारी भावनिक पोस्टही लिहिली.

"प्रत्येक ऋतू सारखा नसतो. काही काळ आपल्याला थांबायला शिकवतो, काही लढायला भाग पाडतो, तर काही सोडून द्यायला शिकवतो. ऋतू आपण निवडू शकत नाही, पण त्या काळात कसं जगायचं हे मात्र आपल्या हातात असतं," असे तिने पोस्टमध्ये म्हटले.

मस्टर्ड यलो ड्रेस चर्चेत

या फोटोशूटसाठी सामंथाने Qua Clothing या ब्रँडचा मस्टर्ड यलो रंगाचा ड्रेस परिधान केला होता. या ड्रेसची किंमत ४,९९५ किंमतीचा असून ड्रेसच्या आरामदायी फिटने तिच्या लूकला अधिक आकर्षक बनवले.

हाय नेक डिझाइन, केप स्टाइल ओव्हरले आणि फ्लोई मॅक्सी पॅटर्नमुळे हा ड्रेस साधा असूनही एलिगंट दिसत होता.

सिंपल ॲक्सेसरीजने वाढवली शोभा

ड्रेसला उठाव देण्यासाठी सामंथाने कमीतकमी पण आकर्षक ॲक्सेसरीजची निवड केली. तिने Tamanna Jewellery चे एमराल्ड आणि डायमंड ड्रॉप इअररिंग्ज घातले होते. यासोबत गोल्डन स्ट्रॅपी स्टिलेटो हिल्सने तिचा लूक अधिक स्टायलिश झाला.

मिनिमल मेकअपमध्ये दिसली ग्लॅमरस

सामंथाने या लूकसाठी नैसर्गिक ग्लोवर भर दिला. ग्लोइंग स्किन, ब्राँझ मेकअप, उठावदार डोळे आणि न्यूड लिपस्टिक यामुळे तिचा लूक अधिक खुलून दिसत होता. केसांचा स्लीक लो पोनीटेल हेअरस्टाईल तिच्या संपूर्ण लूकला परफेक्ट फिनिश देत होता.

प्रेग्नन्सीनंतरही फॅशन कायम

सामंथा रुथ प्रभू आणि तिचे पती राज निदिमोरू त्यांच्या पहिल्या बाळाच्या स्वागताची तयारी करत आहेत. १ डिसेंबर २०२५ रोजी दोघांचे लग्न झाले असून यावर्षीच्या जूनमध्ये 'मा इंटी बंगारम' चित्रपटाच्या जल्लोष समारंभात सामंथाने आपल्या प्रेग्नन्सीची घोषणा केली.

प्रेग्नन्सीनंतरही सामंथा सातत्याने कम्फर्टेबल आणि स्टायलिश मॅटर्निटी फॅशनची झलक चाहत्यांना दाखवत आहे.

फॅशन गोल्स ठरला सामंथाचा नवा लूक

या नव्या फोटोशूटमधून सामंथाने पुन्हा एकदा दाखवून दिले की, साधेपणा, आराम आणि एलिगन्स यांचा योग्य मिलाफ साधला तर प्रेग्नन्सीदरम्यानही स्टायलिश दिसता येते.

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

राज्यातील २६५ तालुक्यांत कोरडा दुष्काळ जाहीर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

'लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी एकत्र या'; SIR विरोधात ४ ऑक्टोबरला मुंबईत जनमोर्चा, राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत

सोनं-दागिने दाखवत बनवायची Reel; चोरट्यांनी VIDEO पाहून साधली संधी, घरातून १ कोटींचा ऐवज लंपास

यवतमाळमध्ये वेल्डिंग करताना भीषण स्फोट; दोघांचा जागीच मृत्यू, ५ जण गंभीर जखमी, Video

नागपूर-मुंबई दुरंतो एक्स्प्रेसवर दगडफेक; खिडक्यांच्या काचा फुटल्या, Video व्हायरल