Stree 2 Teaser is Out  Instagram
मनोरंजन

Stree 2 Teaser: यंदा स्वातंत्र्यदिनी चंदेरीमध्ये माजणार दहशत, 'स्त्री २' चा टीझर रिलीज!

Rajkummar Rao, Shraddha Kapoor: राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर यांची मुख्य भूमिका असलेल्या 'स्त्री' या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचा टीझर रिलीज झाला आहे.

Tejashree Gaikwad

Horror Comedy: बॉलीवूडमध्ये हॉरर-कॉमेडी चित्रपट म्हंटल की 'स्त्री' या सिनेमाचं नाव घेतलं जातं. राजकुमार राव आणि श्रद्धा कपूरच्या हॉरर-कॉमेडी चित्रपट 'स्त्री'ने बॉक्स ऑफिसवर भरपूर यश मिळवले होते. २०१८ मध्ये रिलीज झालेल्या या सिनेमाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. या चित्रपटाने मनोरंजनासोबतच लोकांना भरपूर घाबरवलं. चित्रपटाच्या शेवटी जेव्हा भूत कोण आहे हे उघड झाले तेव्हा निर्मात्यांनी पुढच्या भागाच्या कथेबद्दलही इशारा दिला होता. आता अखेरीस 'स्त्री'च्या यशानंतर आता निर्मात्यांनी 'स्त्री२'चा टीझर अधिकृतपणे रिलीज करण्यात आला आहे.

कधी होणार रिलीज चित्रपट?

राजकुमार राव, श्रद्धा कपूर, पंकज त्रिपाठी यांसारख्या कलाकार असलेला 'स्त्री २' हा चित्रपट यावेळी स्वातंत्र्यदिनी म्हणजेच १५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. आज या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. नुकताच रिलीज झालेला टीझर खूपच इंटरेस्टिंग आहे. काही दिवसांपूर्वी 'स्त्री २' चा टीझर ऑनलाईन लीक झाला होता. या टीझर १४ जून रोजी 'मुंजा' चित्रपटासोबत जोडण्यात आला होता. चित्रपटगृहांमध्ये 'मुंजा' पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांना हा टीझर पाहण्याची संधी मिळाली. यावेळी कोणीतरी ते रेकॉर्ड करून सोशल मीडियावर लीक केले. मात्र, आज अधिकृतपणे हा टीझर जाहीर करण्यात आला आहे.

'स्त्री २'चा टीझर रिलीज करताना मॅडॉक फिल्म्सने लिहिले की, 'यावेळी स्वातंत्र्यदिनी चंदेरीमध्ये दहशत असेल. स्वातंत्र्यदिनी लेजेंड परत येत आहेत.'

कसा आहे टीझर?

हा टीझर प्रेक्षकांना हसवायला आणि सोबतच घाबरवायला अजिबात पाठी पडणार नाही हे टिझरमधून दिसून येत आहे. सोशल मीडियावर हा टीझर रिलीज होताच प्रेक्षकांच्या प्रतिक्रियाही येऊ लागल्या आहेत. प्रेक्षक या टीझरला आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट टीझर म्हणत आहेत. प्रेक्षक कमेंट करत लिहत आहे की 'ओ स्त्री, लवकर ये', 'ही स्त्री आता सर्वांची आवडती बनली आहे.' काही युजर्स यूट्यूबवर टीझर अपलोड करण्याची मागणीही करत आहेत.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक