मनोरंजन

'जय जय स्वामी समर्थ' मालिकेचा बघायला मिळणार श्रावणी सोमवार विशेष भाग; होणार स्वामींमधल्या शिवतत्वाच्या दिव्य अनुभूतीचा प्रारंभ

Shravani Somvar 2024: स्वामींचे लाडके सेवेकरी बाळप्पा आणि गया अतिशय भक्तीभावाने स्वामींची पूजा करताना दिसणार आहेत.

Tejashree Gaikwad

Jai Jai Swami Samarth: 'जय जय स्वामी समर्थ' या कलर्स मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिकेत यंदाचा श्रावणातला पहिला सोमवार, ‘श्रावणी सोमवार विशेष भाग’ सादर होऊन भक्तिभावाने साजरा होणार आहे. 'जय जय स्वामी समर्थ' मालिकेत आतापर्यंत आपण अनेक अतिशय सुंदर सोहळे भव्यतेने पार पडताना पाहिले आहेत. स्वामींचं भक्त अतिशय भक्तीभावाने या सोहळ्यामध्ये सहभागी होतात. या सोहळ्यादरम्यान भक्तांनी स्वामींच्या अनेक लीलांची अनुभुती घेतली आहे. येत्या सोमवारी ५ ऑगस्टला रात्री ८ वाजता साजरा होणारा 'जय जय स्वामी समर्थ' मालिकेतला श्रावणी सोमवारचा विशेष भाग भक्तांसाठी खूप खास असणार आहे.

स्वामींचे लाडके सेवेकरी बाळप्पा आणि गया अतिशय भक्तीभावाने स्वामींची पूजा करताना दिसणार आहेत. दरम्यान स्वामींवर दुग्धाभिषेक होताना दिसणार आहे. बेलपत्रांनी शास्त्रोक्त पद्धतीने विलोभनीय पूजा होणार आहे. शंकराची सहस्त्र नामं घेत ती स्वामी चरणावर वाहिली जातील.

या संपूर्ण पूजेला स्वामींच्या भक्त उद्धराची अक्कलकोटमधली एक गोष्ट जोडली गेली असून महादेवांच्या भेटीची आस बाळगलेल्या गौरीला स्वामींमधल्या शिवतत्वाच्या दिव्य अनुभूतीचा प्रारंभ श्रावणी सोमवार विशेष भागा पासून सुरू होणार आहे.

गुजरातेत हिंदी सक्ती नसेल, तर ती महाराष्ट्रात कशासाठी? खासदार सुप्रिया सुळे यांचा संतप्त सवाल

आज विजयी मेळावा; उद्धव-राज ठाकरे वरळीत एकाच मंचावर येणार

‘जय गुजरात’मुळे वादंग; अमित शहांपुढे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या घोषणेमुळे विरोधक संतप्त

हायकोर्टाची सुनावणी सोमवारपासून लाईव्ह; सुरुवातीला पाच न्यायमूर्तींचा समावेश

मथुरेची शाही ईदगाह मशीद वादग्रस्त संरचना नाही; अलाहाबाद उच्च न्यायालयाने हिंदू पक्षाची याचिका फेटाळली