मनोरंजन

रितेशने लावले प्रेक्षकांना 'वेड'; बॉलिवूडचा 'हा' चित्रपटही पडला फिका

प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख आणि जिनीलिया देशमुखचा मराठी 'वेड' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट ठरत आहे.

प्रतिनिधी

गेल्या शुक्रवारी महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनीलिया देशमुखचा 'वेड' हा सिनेमा प्रदर्शित झाला. बॉलिवूडचा 'सर्कस' आणि हॉलिवूडचा 'अवतार २' यांच्याशी स्पर्धा असतानादेखील प्रेक्षकांनी 'वेड'ला उचलून धरले आहे. हा सिनेमा रिमेक असला तरीही प्रेक्षकांनी या सिनेमाला पसंती दर्शवली आहे. गेल्या ४ दिवसांमध्ये तब्बल १३ कोटींची कमाई केली आहे. प्रसिद्ध सिनेमा परीक्षक तरण आदर्श यांनी ही माहिती दिली.

पहिल्या दिवशी या सिनेमाने ओपनिंगला शुक्रवारी फक्त २.२५ कोटींची कमाई केली होती. मात्र, शनिवारी ३.२५ कोटी तर रविवारी ४.५० कोटींची कमाई केली. विशेष म्हणजे चौथ्या दिवशी म्हणजेच सोमवारी या सिनेमाने तब्बल ३.०२ कोटींची कमाई केली. त्यामुळे येत्या काळामध्ये हा सिनेमा चांगली कामगिरी करेल अशी आशा व्यक्त करण्यात येते आहे. 'वेड' हा सिनेमा साऊथ सिनेमा 'मजिली'चा मराठी रिमेक आहे. 'वेड' या सिनेमाचे दिग्दर्शनदेखील रितेश देशमुखने केले आहे. यामध्ये रितेश देशमुख आणि जिनीलिया देशमुखशिवाय अशोक सराफ, खुशी हजारे, जया शंकर, रविराज खाडे, शुभंकर तावडे, राहुल देव असे कलाकार पाहायला मिळतात. जिनीलियाचा हा पहिलाच मराठी सिनेमा आहे. तसेच, अजय-अतुल यांच्या संगीताची जादूही प्रेक्षकांना अनुभवायला मिळत आहे.

पावसाची विश्रांती; पूरस्थिती कायम! पूरग्रस्त शेतकऱ्यांना हवा मदतीचा आधार; अतिवृष्टी, गारपीट, टंचाईग्रस्तांना जिल्हा वार्षिक निधीतून मदत

अहिल्यानगरमध्ये तणाव; रास्ता रोको, लाठीमार

भारत-भूतान रेल्वेमार्गाने जोडणार; प्रकल्पाचा संयुक्त आराखडा जाहीर

पीडितांकडे न्यायालयाचे दुर्लक्ष नको; सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी

राहुल गांधींच्या छातीत गोळी घालू; केरळ भाजप प्रवक्त्याचे धक्कादायक विधान