मनोरंजन

Bigg Boss OTT 3: 'बोहोत हो गया झक्कास अब होगा कुछ खास', कधी सुरु होणार बिग बॉस ओटीटी?

Anil Kapoor: रिॲलिटी शो 'बिग बॉस ओटीटी' तिसऱ्या सीझनसह प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे.

Tejashree Gaikwad

Reality Shows: रिॲलिटी शो 'बिग बॉस ओटीटी' तिसऱ्या सीझनसह प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. यंदा बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अनिल कपूर हा शो होस्ट करणार आहेत. सोमवारी, निर्मात्यांनी शोचा नवीन प्रोमो रिलीज केला आहे. ज्यामध्ये अनिल कपूर चाहत्यांना खात्री देताना दिसत आहेत की या सीजनमध्ये खूप मज्जा येणार आहे.

"नियम नया, गेम वही.... बोहोत हो गया रे झक्कास अब और होगा कुछ खास," असं म्हणतं अनिल कपूरने प्रेक्षकांना हा सीजन खास होणार आहे असं सांगितलं आहे. अनिल कपूर या शोमधील स्पर्धकांना कसे सामोरे जाणार हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

"अनिल कपूर येथे नायक वाइब्स देत आहे... या सीझनची वाट पाहू शकत नाही," एका सोशल मीडिया युजरने टिप्पणी केली. "अनिल कपूर एका नवीन अवतारात," दुसऱ्याने लिहिले.

हे ही वाचा

बिग बॉस ओटीटीचा दुसरा सीझन करण जोहर आणि त्या आधीचा सलमान खान यांनी होस्ट केला होता. प्रत्येक सीझन आपल्या ड्रामा आणण्यासाठी ओळखला जात असताना, आगामी सीझन अनिल कपूरमुळे कसा रंगणार हे जाणून घेणे खास ठरणार आहे. अनिल कपूरचे चाहते त्याचे होस्टिंग म्हणून पदार्पण पाहण्यासाठी उत्सुकतेने वाट पाहत आहेत. रिॲलिटी शोचा हा बहुप्रतिक्षित सीझन २१ जूनपासून JioCinema वर प्रदर्शित होणार आहे.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक