मनोरंजन

Bigg Boss Marathi: कधी सुरु होणार 'बिग बॉस मराठी' चा नवीन सीजन? रितेश देशमुख करणार कल्ला

Tejashree Gaikwad

Bigg Boss Marathi Season 5: तंटा नाय तर घंटा नाय... रितेश भाऊचा हा डायलॉग आज महाराष्ट्रातील घराघरांत तोंडपाठ झालाय. रिअ‍ॅलिटी शोचा बाप असणाऱ्या 'बिग बॉस मराठी'चे आतापर्यंत चार प्रोमो आऊट झाले. या चारही प्रोमोमध्ये रितेश देशमुखची 'लयभारी बॉसगिरी' पाहायला मिळाली. आता एक नवीन, सॉलिड, जबरी प्रोमो 'बिग बॉस'प्रेमींच्या भेटीला आलाय. प्रोमो पाहून सारेच म्हणतायत,"आररर खतरनाक". तसेच 'बिग बॉस'च्या घराचं दार कधी उघडणार याची प्रतीक्षाही संपली आहे.

'बिग बॉस मराठी'च्या आतापर्यंत आलेल्या प्रोमोमध्ये रितेश देशमुखचा रुबाब पाहायला मिळाला. पण नव्या प्रोमोमध्ये रितेश भाऊ एका वेगळ्याच रांगड्या अंदाजात दिसतोय की राव... प्रोमोमध्ये एक आगळीवेगळी ऊर्जा अन् जोश आहे. प्रोमोनुसार, यंदा ढोल ताशाच्या गजरात सगळे स्पर्धक 'बिग बॉस'च्या चक्रव्यूव्हमध्ये शिरणार आहेत. जे चांगले वागणार त्यांची रितेश भाऊ वाहवाह करणार... पण जे वाईट वागणार त्यांची तो... एकंदरीत काय तर सगळ्यांची वाजणार अन् हा सीझन गाजणार.. कारण रितेश भाऊ म्हणतोय,"मी येणार तर कल्ला होणारच". आपल्या लाडक्या 'बिग बॉस' प्रेमींना नाराज न करता रितेश देशमुखने नव्या प्रोमोच्या माध्यमातून यंदाच्या सीझनची तारीखदेखील जाहीर केली आहे. या प्रोमोने सर्वत्र धुरळा उडवून दिलाय.

आला रे आला... 'बिग बॉस मराठी'चा धमाका! तारीख जाहीर

मजा, मस्ती, ड्रामा अन् राडा असणारे बिग बॅास मराठीचे सुसज्ज आलिशान घर, 100 दिवस आणि अतरंगी स्पर्धकांचा सतरंगी प्रवास …. फक्त 15 दिवसांत सुरू होणार आहे. मराठी मनोरंजनाच्या 'BIGG BOSS Marathi'चा ग्रँड प्रीमिअर रविवारी 28 जुलैला रात्री 9 वाजता 'कलर्स मराठी'वर होणार आहे आणि त्यानंतरचे भाग दररोज रात्री 9 वाजता प्रेक्षकांना पाहता येतील.

मराठी मनोरंजनाचा बाप... ज्याची वाट अख्खा महाराष्ट्र बघतो... सुरु व्हायच्या आधीच ज्याच्या बद्दलच्या चर्चेला उधाण येतं, असा आपल्या सगळ्यांचा आवडता कार्यक्रम 'बिग बॉस मराठी' अवघ्या काही दिवसांत सुरू होत आहे. तारीख जाहीर झाल्याने यंदा कोणते स्पर्धक 'बिग बॉस मराठी'च्या घरात धूम करणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. ‘बिग बॉस मराठी'चं बिगुल आता वाजणार आणि स्पर्धकांच्या करामतींचा आता कस लागणार!! प्रत्येक आठवड्यात लागेल झटका, आणि रंगणार मनोरंजनाचा धमाका. अशक्य अशा गोष्टींनी बनलेला 'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीसाठी आता सज्ज आहे.

मविआचा तिढा सुटला! २६० जागांवर सहमती; २८ जागांवर रस्सीखेच; १-२ दिवसांत जागावाटप जाहीर होणार

पोलिसांवर हायकोर्ट संतापले; अतिरिक्त पोलीस आयुक्तांना हजर राहण्याचे आदेश

Maharastra Assembly Elections 2024: पक्षांतर्गत बंडाळीच्या धोक्यामुळे महायुती, मविआकडून सावध पवित्रा

नागरिकत्व कायद्यातील अनुच्छेद '६ए' वैध; सर्वोच्च न्यायालयाचा बहुमताने निर्वाळा

न्या. संजीव खन्ना हे आपले उत्तराधिकारी; सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी केली शिफारस