Photo : reddit 
आंतरराष्ट्रीय

अफगाणिस्तानही करणार पाकची पाणीकोंडी; कुनार नदीचे पाकिस्तानात जाणारे पाणी रोखण्याच्या हालचाली

कुनार नदीवर शक्य तितक्या लवकर धरण बांधण्याचे आदेश तालिबानचे सर्वोच्च नेते मवलावी हिबतुल्ला अखुंदजादा यांनी दिले आहेत. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सशस्त्र संघर्ष पेटलेला असताना आणि शेकडो लोकांचा बळी गेल्यानंतर आता अफगाणिस्तानकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

Swapnil S

काबूल : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंधू जल कराराला स्थगिती देत पाकिस्तानात जाणारे पाणी रोखून पाकची पाणीकोंडी केली होती. तशाच प्रकारचा निर्णय आता तालिबानशासित अफगाणिस्तानकडून घेण्यात येत असून यामुळे पाकची दोन्ही बाजूंनी पाणीकोंडी होण्याची चिन्हे आहेत. अफगाणिस्तान आता पाकिस्तानला जाणारे कुनार नदीचे पाणी अडविण्यासाठी या नदीवर धरण बांधण्याची योजना आखत आहे.

कुनार नदीवर शक्य तितक्या लवकर धरण बांधण्याचे आदेश तालिबानचे सर्वोच्च नेते मवलावी हिबतुल्ला अखुंदजादा यांनी दिले आहेत. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सशस्त्र संघर्ष पेटलेला असताना आणि शेकडो लोकांचा बळी गेल्यानंतर आता अफगाणिस्तानकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. भारताने मे महिन्यात घेतलेल्या निर्णयाची पुनरावृत्ती अफगाणिस्तानने केल्याचे यातून दिसून येत आहे. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारताने तीन नद्यांमधून पाकिस्तानात वाहून जाणारे पाणी थांबवले. पाकिस्तानात पाणी सोडण्यासंबंधी असलेल्या सिंधू जल कराराला भारताने स्थगिती दिली. तशीच चाल आता अफगाणिस्तान खेळणार आहे.

तालिबानचे सर्वोच्च नेते मवलावी हिबतुल्ला अखुंदजादा यांनी कुनार नदीवर शक्य तितक्या लवकर धरण बांधण्याचे काम सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. यासाठी परदेशी कंपन्यांशी करार करण्यात वेळ वाया जाण्याची शक्यता असल्याने देशांतर्गत कंपन्यांशी करार करा, असेही त्यांनी म्हटले आहे.

याबाबतची माहिती जल व ऊर्जा मंत्रालयाचे उपमंत्री मुहाजेर फराही यांनी गुरुवारी ‘एक्स’वर पोस्ट शेअर करत दिली. जवळपास ४८० किमी लांबीची कुनार नदी ईशान्य अफगाणिस्तानातील हिंदुकुश पर्वतरांगांमध्ये आणि पाकिस्तान सीमेजवळील ब्रोघिल खिंडीजवळ उगम पावते. ही नदी कुनार आणि नांगरहार प्रांतांमधून दक्षिणेकडे वाहते. त्यानंतर ती पाकिस्तानमधील खैबर पख्तुनख्वामध्ये प्रवेश करते. जिथे ती जलालाबाद शहराजवळ काबूल नदीला जाऊन मिळते. कुनार नदीला पाकिस्तानमध्ये चित्राल नदी म्हणून ओळखले जाते.

पाकिस्तान वापरतो कुनार नदीचे ७०-८० टक्के पाणी

पाकिस्तानला कुनार नदीचे ७०-८० टक्के पाणी मिळते. जर अफगाणिस्तानने कुनार नदीवर धरण बांधले तर त्यामुळे पाकिस्तानचे गंभीर नुकसान होणार आहे. याचा थेट परिणाम खैबर पख्तूनख्वावर (केपीके) होईल. बाजौर आणि मोहम्मदपूरसारख्या भागातील शेती पूर्णपणे या नदीवर अवलंबून आहे. सिंचन थांबवल्याने येथील पिके धोक्यात येतील. याव्यतिरिक्त, पाकिस्तानच्या चित्राल जिल्ह्यातील कुनार नदीवर चालणाऱ्या २० हून अधिक लघु जलविद्युत प्रकल्पांवर परिणाम होईल. हे सर्व प्रकल्प कुनार नदीच्या प्रवाहात आहेत, म्हणजेच ते नदीच्या प्रवाहातून थेट वीज निर्माण करतात.

आजचे राशिभविष्य, २६ ऑक्टोबर २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, "हातावर वेदना...

ऐन दिवाळीत मुलाचा अपघाती मृत्यू; पण पालकांचा उदात्त निर्णय; सत्यम दुबे ठरला वसईतील सर्वात तरुण अवयवदाता!

बापच बनला हैवान! बुलढाण्यात जुळ्या मुलींची पित्याने केली हत्या, पत्नीचा राग चिमुकल्यांच्या जीवावर बेतला

महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण : आरोपी प्रशांत बनकरला ४ दिवसांची पोलिस कोठडी