आंतरराष्ट्रीय

कॅनडामध्ये भारतीय वंशाच्या उद्योजकाची गोळ्या झाडून हत्या; बिश्नोई टोळीने जबाबदारी स्वीकारली

भारतीय वंशाचे उद्योजक दर्शन सिंग साहसी यांची कॅनडामध्ये गोळी झाडून हत्या करण्यात आली. घराबाहेर पडत असताना त्यांच्यावर गोळी झाडण्यात आली. दर्शनसिंग टेक्सटाईल रिसायकलिंग व्यवसायाशी निगडित होते.

Swapnil S

ओट्टावा : भारतीय वंशाचे उद्योजक दर्शन सिंग साहसी यांची कॅनडामध्ये गोळी झाडून हत्या करण्यात आली. घराबाहेर पडत असताना त्यांच्यावर गोळी झाडण्यात आली. दर्शनसिंग टेक्सटाईल रिसायकलिंग व्यवसायाशी निगडित होते. दरम्यान, लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित गुन्हेगार गोल्डी ढिल्लन याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून या हत्येची जबाबदारी स्वीकारली.

प्राथमिक माहितीनुसार, दर्शनसिंग यांना गेल्या काही दिवसांपासून खंडणीच्या धमक्या येत होत्या. परंतु त्यांनी ही बाब गांभीर्याने घेतली नव्हती. मात्र, घटनेच्या दिवशी दर्शन सिंग कॅनडातील घरातून बाहेर पडताच त्यांच्यावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.

वैमनस्यातून हत्येचा संशय

कॅनेडियन पोलिसांनी सध्या या हत्येत कोणत्याही गुंड किंवा खंडणीखोरांच्या टोळीचा सहभाग नसल्याचे सांगितले. पोलिसांचे म्हणणे आहे की, कुटुंबाने यासंदर्भात कोणताही संशय व्यक्त केलेला नाही. जुन्या वैमनस्यातून किंवा वैयक्तिक वादातून ही हत्या करण्यात आली असावी, असा अंदाज व्यक्त केला आहे.

दर्शन सिंग हे मूळचे पंजाबच्या लुधियाना जिल्ह्यातील दोराहा भागातील असून ते कॅनडामधील रहिवासी होते. भारतीय अमेरिकन समुदायात त्यांचा खूप आदर केला जात होता. दर्शन सिंग हे सामाजिक सेवा आणि धर्म कार्यात सक्रियपणे सहभागी होते.

जबाबदारी स्वीकारली

दरम्यान, लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित गुन्हेगार गोल्डी ढिल्लन याने सोशल मीडिया पोस्टमध्ये बिझनेसमॅन दर्शन सिंग यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली. पोस्टमध्ये टोळीने दावा केला की, दर्शन सिंग यांच्याकडे त्यांनी पैसे मागितले होते. परंतु, त्यांनी पैसे देण्यास नकार दिला. दर्शन सिंग यांनी बिश्नोई टोळीचा नंबर ब्लॉक केला होता. त्यानंतर टोळीने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या.

संजय राऊत यांना गंभीर आजार; बाहेर जाण्यास, गर्दीत मिसळण्यास निर्बंध, पोस्ट करीत म्हणाले - 'नवीन वर्षात भेटू'

New Rules From November 1: उद्यापासून बँकिंग, GST, आधार आणि पेन्शनमध्ये मोठे बदल; तुमच्यावर कसा होणार परिणाम? जाणून घ्या

Powai Hostage Case : 'तो आधी फ्रेंडली होता, नंतर...'; ओलिस ठेवलेल्या मुलीने सांगितला घटनेचा थरार

Powai Hostage Case : माजी मंत्री दीपक केसरकरांचा जुना व्हिडिओ व्हायरल; रोहित आर्यच्या प्रकल्पाचं केलं होतं कौतुक

कल्याणमध्ये ३० वर्षांपासून राहणाऱ्या नेपाळी महिलेचा पर्दाफाश; भारतीय कागदपत्रांसह मुंबई विमानतळावर घेतले ताब्यात