चीनवर १०० टक्के टॅरिफ; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा 
आंतरराष्ट्रीय

चीनवर १०० टक्के टॅरिफ; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

भारतासह अन्य देशांना टॅरिफचा दणका देणाऱ्या 'फोर्स-वन'ने आता 'ड्रॅगन' कडे आपला मोर्चा वळविला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनच्या वस्तूंवर १०० टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये व्यापारयुद्ध भडकण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Swapnil S

वॉशिंग्टन : भारतासह अन्य देशांना टॅरिफचा दणका देणाऱ्या 'फोर्स-वन'ने आता 'ड्रॅगन' कडे आपला मोर्चा वळविला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनच्या वस्तूंवर १०० टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये व्यापारयुद्ध भडकण्याची शक्यता वर्तविली जात आहे. येत्या १ नोव्हेंबरपासून चीनवर हा टॅरिफ लावण्यात येणार आहे. त्याचबरोबर ट्रम्प यांनी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेणार नसल्याचेही स्पष्ट केले आहे.

यापूर्वी चीनने दुर्मिळ खनिजांच्या निर्यातीवर बंदी घातली होती. अशा परिस्थितीत, चीनच्या कारवाईला उत्तर म्हणून ट्रम्प यांनी ताबडतोब हा निर्णय घेतला. चीनच्या या निर्णयानंतर ट्रम्प यांनी चीनने दुर्मिळ खनिज निर्यात बंदीचा निर्णय मागे घेतला नाही तर अमेरिका चिनी वस्तूंवर 'जोरदार कर' लादेल, असा इशाराही दिल्यावर अखेरीस चिनी आयातींवर १०० टक्के कराचा बोजा लादला.

ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रूथ सोशलवर एका पोस्टमध्ये लिहिले आहे की, दुर्मिळ पृथ्वी उत्पादनांवर मोठ्या प्रमाणात निर्यात नियंत्रणे लादण्याचा चीनचा निर्णय अपवादाशिवाय सर्व देशांवर परिणाम करतो. ट्रम्प म्हणाले, आत्ताच कळले की चीनने व्यापारावर खूप आक्रमक भूमिका घेतली आहे आणि जगाला एक अतिशय प्रतिकूल पत्र पाठवले आहे ज्यामध्ये म्हटले आहे की ते १ नोव्हेंबर २०२५ पासून बनवणाऱ्या जवळजवळ प्रत्येक उत्पादन आणि काही उत्पादनांवर जे ते बनवत नाहीत त्यावर मोठ्या प्रमाणात निर्यात नियंत्रणे लादणार आहेत.

निर्यात रोखण्याची धमकी

ट्रम्प यांनी चीनवर १०० टक्के म्हणजे चिनी वस्तूंवर आयात शुल्क लावण्याची घोषणा केली आहे, जी इतर कोणत्याही अतिरिक्त टॅरिफ व्यतिरिक्त असेल. तसेच ट्रम्प यांनी महत्त्वाच्या सॉफ्टवेअरची निर्यात रोखण्याची धमकीही दिली आहे. ट्रूथ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील एका पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, चीनवर नवीन टॅरिफ कर सध्या लागू असलेल्या इतर कोणत्याही करांपेक्षा वेगळे असतील.

सॉफ्टवेअर निर्यातीवर बंदी

याशिवाय ट्रम्प यांनी जिनपिंग यांच्याशी चर्चा किंवा बैठकीसही नकार दिला असून ट्रम्प यांनी अमेरिका सर्व महत्त्वाच्या सॉफ्टवेअर निर्यातीवर बंदी घालणार असल्याचेही म्हटले. दरम्यान, ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे जगातील दोन सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांमधील व्यापार युद्ध आणखी वाढू शकते. याआधी ट्रम्प यांनी रशियाकडून तेल खरेदीचा हवाला देत भारतावर २५ टक्के अतिरिक्त शुल्क आकारले होते पण, चीनला यामधून वगळले होते.

चीनला सर्वाधिक फटका

चीनने १ नोव्हेंबरपासून लागू होणाऱ्या दुर्मिळ पृथ्वी खनिजांवर निर्यात मर्यादा लादण्याच्या निर्णय घेतला आहे. त्याविरोधात ट्रम्प यांनी सॉफ्टवेअर निर्यातीवर शुल्क वाढ आणि नियंत्रणाची घोषणा केली आहे. ट्रम्प म्हणाले की, चीनच्या या हालचालीमुळे बाजार आणि संपूर्ण जगासाठीच समस्या निर्माण होतील, तसेच याचा सर्वाधिक फटका चीनला बसेल.

सरकारकडून शेती कर्जवसुलीला स्थगिती

मनपा निवडणुकीत युती म्हणूनच लढणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संकेत

डिजिटल युगात मुलींच्या सुरक्षेबाबत सरन्यायाधीश भूषण गवई यांना चिंता

'पंतप्रधान धन-धान्य कृषी' योजनेचा शुभारंभ; ४२ हजार कोटींची योजना

अफगाणी परराष्ट्र मंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना मज्जाव; देशभरातून संताप