संग्रहित छायाचित्र  
आंतरराष्ट्रीय

भारतासोबतचे संबंध पुन्हा स्थापित करण्यास तयार! ट्रम्प यांना आली उपरती; मोदींकडून ट्रम्प यांच्या विचारांचे कौतुक

भारताविरुद्ध शुक्रवारी वक्तव्य केल्यानंतर सुमारे १२ तासांतच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा युटर्न घेतला आहे. व्हाईट हाऊसमध्ये सायंकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत विचारलेल्या एका प्रश्नावर ते म्हणाले की, 'मी नेहमीच मोदींचा मित्र राहीन. भारतासोबतचे संबंध पुन्हा स्थापित करण्यास मी तयार आहे.'

Swapnil S

वॉशिंग्टन डीसी : भारताविरुद्ध शुक्रवारी वक्तव्य केल्यानंतर सुमारे १२ तासांतच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा युटर्न घेतला आहे. व्हाईट हाऊसमध्ये सायंकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत विचारलेल्या एका प्रश्नावर ते म्हणाले की, 'मी नेहमीच मोदींचा मित्र राहीन. भारतासोबतचे संबंध पुन्हा स्थापित करण्यास मी तयार आहे.'

शुक्रवारी सकाळी ६ वाजता त्यांनी सोशल मीडिया ट्रुथवर लिहिले होते की, 'असे दिसते की आपण भारत आणि रशियाला चीनद्वारे गमावले आहे. आशा आहे की त्यांचे भविष्य चांगले असेल.'

पत्रकार परिषदेत ट्रम्प यांनी भारत आणि इतर देशांसोबत सुरू असलेल्या व्यापार चर्चा प्रगतीपथावर असल्याचे मत व्यक्त केले. मात्र, ट्रम्प यांनी 'युरोपियन युनियन'ने गुगलवर ३.५ अब्ज डॉलरचा दंड ठोठावल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. भारत रशियाकडून तेल खरेदी करीत असल्याबद्दल ट्रम्प यांनी भारताच्या या धोरणाबाबत निराशा प्रकट केली. ते म्हणाले, 'आम्ही यासाठी भारतावर ५०% इतका मोठा कर लादला आहे.'

मोदींकडून ट्रम्प यांच्या विचारांचे कौतुक

शनिवारी ९:४५ वाजता, पंतप्रधान मोदींनी ट्रम्प यांचे विधान शेअर केले आणि 'एक्स'वर लिहिले की, मी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या भावना आणि आमच्या संबंधांबद्दलच्या त्यांच्या विचारांचे मनापासून कौतुक करतो आणि त्यांना पूर्ण पाठिंबा देतो. ते म्हणाले, भारत-अमेरिकेत सकारात्मक आणि दूरदर्शी धोरणात्मक भागीदारी आहे.

IIT बॉम्बेतील साहिल वाकोडे आत्महत्येप्रकरणी प्राध्यापक निलंबित; 'त्या' निवेदनावरून संस्थेची माफी

Mumbai : ‘बटरफ्लाय’ रोखणार पाणी गळती; जलवाहिन्यांवर बटरफ्लाय झडपा बसवणार, गणेश खणकर यांच्या मागणीची दखल

Mumbai : चौपाटी, विसर्जनस्थळी चोख व्यवस्थापन; देशभरातील तज्ज्ञांकडून पालिका, पोलिसांचे कौतुक

गणेश विसर्जनासाठी BMC सज्ज; ३८३ कृत्रिम तलावांची व्यवस्था, ६७ नैसर्गिक विसर्जनस्थळांवरही सुविधा, २५ हजार अधिकारी-कर्मचारी तैनात

बार्सिलोनामध्ये ‘गणपती बाप्पा मोरया’; महाराष्ट्र मंडळ स्पेनतर्फे गणेशोत्सव, स्पॅनिश कलाकारांचाही सहभाग