अमेरिकेतील प्रचारात 'ऑपरेशन सिंदूर'चा बोलबाला; टॅरिफची धमकीने युद्ध थांबविल्याचा ट्रम्प यांचा दावा 
आंतरराष्ट्रीय

अमेरिकेतील प्रचारात 'ऑपरेशन सिंदूर'चा बोलबाला; टॅरिफची धमकीने युद्ध थांबविल्याचा ट्रम्प यांचा दावा

टॅरिफची धमकी देऊन दोन अण्वस्त्रसज्ज शेजाऱ्यांना युद्ध करण्यापासून रोखल्याचा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकीच्या प्रचार सभांमध्ये केला त्यामुळे अमेरिकेच्या प्रचारात ऑपरेशन सिंदूरचा बोलबाला झाला.

Swapnil S

वॉशिंग्टन : टॅरिफची धमकी देऊन दोन अण्वस्त्रसज्ज शेजाऱ्यांना युद्ध करण्यापासून रोखल्याचा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकीच्या प्रचार सभांमध्ये केला त्यामुळे अमेरिकेच्या प्रचारात ऑपरेशन सिंदूरचा बोलबाला झाला. तसेच आपल्याला या प्रयत्नांसाठी शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली आहे.

भारताने प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तान आणि पाकिस्तानव्याप्त जम्मू-कश्मीरमधील दहशतवादी ठिकारांना लक्ष्य करत मे २०२५ मध्ये 'ऑपरेशन सिंदूर' राबवले होते. शुक्रवारी फ्लोरिडा येथे एका निवडणूक सभेला संबोधित करताना ट्रम्प यांनी, गेल्या वर्षी भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध वाढण्यापासून रोखल्याचे श्रेय पुन्हा एकदा स्वतःकडे घेतले. आपण दोन्ही देशांवर प्रचंड टॅरिफ लादण्याची धमकी दिली होती, असे त्यांनी सांगितले. या दोन अण्वस्त्रधारी देशांना राग आला होता, पण त्यांनी गोळीबार थांबवला, असे ट्रम्प म्हणाले.

भारत आणि पाकिस्तान जे दोन अण्वस्त्रधारी देश आहेत त्यांना आपण सांगितले की, जर तुम्ही असे करणार असाल, तर तुम्ही अमेरिकेसोबत व्यापार करू शकणार नाही, आपण दोघांवरही २५० टक्के प्रचंड टॅरिफ लादणार आहे, ज्यामुळे तुम्हाला कोणताही व्यवसाय करता येणार नाही, असे ट्रम्प यांनी नमूद केले. भारत आणि पाकिस्तान खूप संतप्त झाले, पण त्यांनी गोळीबार थांबवला आणि युद्ध संपले, असे त्यांनी सांगितले. मी ही सर्व युद्धे थांबवली, आणि असे करणे खरोखरच सन्मानाची गोष्ट आहे या कार्यात संयुक्त राष्ट्रांकडून आपल्याला कोणतीही मदत मिळाली नाही, असेही त्यांनी नमूद केले.

मी संयुक्त राष्ट्रांना एकही फोन कॉल केला नव्हता, पण आम्ही ती सर्व युद्धे थांबवली, आणि अजून दोन-तीन बाकी आहेत. जेव्हा मी निवडणुकीच्या रिंगणात उतरलो होतो, तेव्हा जगात इतकी युद्धे सुरू आहेत याची मला कल्पनाही नव्हती, आपल्या मुत्सद्देगिरीच्या मध्यस्थीमुळे आठ युद्धे मिटवली असल्याचा दावा करताना ट्रम्प यांनी, आपल्याला नोबेल शांतता पुरस्कार मिळाला नसल्याबद्दल खंत व्यक्त केली.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : पुनर्विकासात उशीर केल्यामुळे गृहनिर्माण संस्थेला ६.२० कोटींची भरपाई

कॅनरा बँकेची २१२.३४ कोटींची फसवणूक; CBI चे छापे

Mumbai : बेस्ट बसमध्ये न घेतल्यास कोयता हाती घेऊ! मच्छिमार महिला संतप्त

Mumbai 'एसआयआर'मध्ये गोलमाल; एकाच व्यक्तीकडून एकाच दिवशी २४ अर्ज, धारावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

वनडे मालिका जिंकण्यासाठी भारतीय महिला सज्ज; झिम्बाब्वेविरुद्धचा दुसरा एकदिवसीय सामना आज