प्रातिनिधिक छायाचित्र  
आंतरराष्ट्रीय

पुन्हा ऑपरेशन सिंदूरच्या भीतीने पाकिस्तानी दहशतवादी संघटनांची पळापळ

भारताकडून ऑपरेशन सिंदूरसारखी कारवाई पुन्हा होण्याच्या भीतीने पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिद्दीन यांचे धाबे दणाणले असून त्यांनी पाकव्याप्त काश्मीरमधून काढता पाय घेत खैबर पख्तुनख्वा प्रांतात त्यांचे तळ हलवण्यास सुरुवात केली आहे. दहशतवादी संघटनांकडून होणारी ही हालचाल पाकिस्तान सरकारच्या थेट सहकार्याने केली जात आहे, असेही आढळले आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : भारताकडून ऑपरेशन सिंदूरसारखी कारवाई पुन्हा होण्याच्या भीतीने पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिद्दीन यांचे धाबे दणाणले असून त्यांनी पाकव्याप्त काश्मीरमधून काढता पाय घेत खैबर पख्तुनख्वा प्रांतात त्यांचे तळ हलवण्यास सुरुवात केली आहे. दहशतवादी संघटनांकडून होणारी ही हालचाल पाकिस्तान सरकारच्या थेट सहकार्याने केली जात आहे, असेही आढळले आहे.

लष्करी संघर्ष

ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय सशस्त्र दलांनी अचूक हल्ले करत बहावलपूर, मुरीदके आणि मुझफ्फराबादसह ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते. पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून, भारताने ७ मे रोजी ऑपरेशन सिंदूर राबविले होते. ज्यामध्ये पाकिस्तानच्या नियंत्रणाखालील प्रदेशातील दहशतवादी तळांना लक्ष्य केले होते. या हल्ल्यांमुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये चार दिवस तीव्र लष्करी संघर्ष झाला होता.

खैबर पख्तुनख्वाला स्थलांतर संस्थांनी संयुक्तपणे तयार केलेल्या कागदपत्रानुसार, दहशतवादी संघटना पीओकेमधून बाहेर पडत भारतीय सुरक्षा आणि गुप्तचर आहेत, कारण भारतीय हल्ल्यांच्या दृष्टीने हा प्रदेश असुरक्षित आहे.

जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिद्दीनसारख्या दहशतवादी संघटनांनी त्यांचे तळ खैबर पख्तुनख्वा येथे स्थलांतरित करण्यास सुरुवात केली आहे. या कागदपत्रांमध्ये पाकिस्तानातील काही ठिकाणी पोलीस संरक्षणात आयोजित करण्यात आलेल्या आणि जमियत उलेमा-ए-संघटनांचा "मौन सहभाग" जैश-ए-मोहम्मदच्या मेळाव्यांचा इस्लामसारख्या राजकीय-धार्मिक असल्याचा पुरावा म्हणून उल्लेख करण्यात आला आहे.

भरती मोहीम

या कागदपत्रात मानसेहरामध्ये अलीकडेच झालेल्या दहशतवादी संघटनांतील भरतीचा उल्लेख सर्वात महत्त्वाचा आहे. या भरती मोहिमेचा उद्देश मानसेहरा येथील जैशच्या मरकज शोहदा-ए-इस्लाम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुविधेत प्रशिक्षणासाठी लोकांना एकत्र करणे होता, असे या कागदपत्रात म्हटले आहे. यावरून असे दिसून येते की, जैशच्या प्रशिक्षण केंद्रातील बांधकामात मोठी वाढ झाली आहे.

ही भरती प्रक्रिया जैश-ए-मोहम्मद आणि जमियत उलेमा-ए-इस्लाम यांनी संयुक्तपणे राबवली होती.

मराठवाड्यात संततधार पाऊस; गावांचा संपर्क तुटला, जनजीवन विस्कळीत

"हास्यास्पद नाटकं करून सत्य लपवता येत नाही"; संयुक्त राष्ट्रांत पाकिस्तानवर भारताचा घणाघात

Maharashtra Rain : राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; हवामान खात्याचा इशारा

गायक झुबीन गर्ग मृत्यू प्रकरण : आयोजक व मॅनेजरवर लुकआउट नोटीस जारी; मुख्यमंत्री सरमा म्हणाले, अन्यथा...

MPSC ची राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलली