आंतरराष्ट्रीय

रशिया-युक्रेन संघर्ष सोडविण्यासाठी सहकार्य करण्यास भारत तयार; मोदी यांनी पुतिन यांना केले आश्वस्त

मोदी ब्रिक्स शिखर परिषदेसाठी येथे आले असून त्यांनी पुतिन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. या प्रदेशात स्थैर्य आणि शांतता नांदण्यासाठी पूर्ण सहकार्य करण्यास भारत तयार असल्याचे मोदी यांनी रशियाच्या नेत्यांना सांगितले.

Swapnil S

कझान : रशिया-युक्रेन संघर्ष शांततापूर्ण मार्गाने सोडविण्यात यावा आणि त्यासाठी आवश्यक असलेले सर्व प्रकारचे सहकार्य करण्यास भारत तयार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांना मंगळवारी आश्वस्त केले.

मोदी ब्रिक्स शिखर परिषदेसाठी येथे आले असून त्यांनी पुतिन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. या प्रदेशात स्थैर्य आणि शांतता नांदण्यासाठी पूर्ण सहकार्य करण्यास भारत तयार असल्याचे मोदी यांनी रशियाच्या नेत्यांना सांगितले. गेल्या तीन महिन्यांत आपण दुसऱ्यांदा रशिया भेटीवर आलो आहोत. त्यावरून दोन देशांमधील समन्वय आणि विश्वास अधोरखित होत आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.

रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्षावर आमचे सातत्याने लक्ष आहे, शांततापूर्ण मार्गाने तिढा सोडविला पाहिजे यावर आमचा विश्वास आहे. शांतता आणि स्थैर्य अबाधित राहण्यासाठी आम्ही पूर्ण सहकार्य करण्यास तयार आहोत, मानवतेला आमचे प्राधान्य आहे, आगामी काळात भारत संपूर्ण सहकार्य करण्यास तयार आहे, असेही मोदी म्हणाले.

अदानी पुन्हा गोत्यात; सौरऊर्जा कंत्राट मिळविण्यासाठी दिली 2000 कोटींची लाच, अमेरिकेतील कोर्टात आरोप

मुख्यमंत्रीपदावरून रणकंदन! महायुतीत फडणवीस, शिंदे, अजित पवारांच्या नावाचे दावे

अपक्ष, बंडखोरांवर सत्ता स्थापनेची मदार; महायुती व मविआची जोरदार मोर्चेबांधणी

रशियाचा युक्रेनवर आंतरखंडीय क्षेपणास्त्राने हल्ला

कोल्हापूरच्या चेतन पाटीलला जामीन मंजूर; जयदीप आपटेच्या जामिनावर सोमवारी सुनावणी