इराणचे परराष्ट्र मंत्री परत पाकिस्तान दौऱ्यावर 
आंतरराष्ट्रीय

इराणचे परराष्ट्र मंत्री परत पाकिस्तान दौऱ्यावर

इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची पुन्हा एकदा पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेले असून दोन दिवसांतील हा त्यांचा दुसरा दौरा आहे.

Swapnil S

इस्लामाबाद : इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची पुन्हा एकदा पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेले असून दोन दिवसांतील हा त्यांचा दुसरा दौरा आहे. या दौऱ्यात ते पाकिस्तानी नेत्यांची भेट घेणार आहेत. इस्लामाबादमध्ये अल्प मुक्कामानंतर अराघची रशियाला रवाना होतील.

अराघची यांनी शनिवारी इस्लामाबादमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी इराणच्या अटी आणि अमेरिकेच्या पाकिस्तानप्रती असलेल्या मागण्यांवरील आपला आक्षेप मांडला. अमेरिकेशी थेट वाटाघाटी करणार नसून पाकिस्तानमार्फत इराण आपली भूमिका मांडेल, असे इराणने स्पष्ट केले आहे. अराघची शनिवारी संध्याकाळी ओमानच्या दौऱ्यावर गेले. त्यांनी ओमानचे सुलतान तारिक बिन हैथम यांची भेट घेतली. यावेळी युद्ध आणि शांततेच्या प्रयत्नांवर चर्चा झाली.

प्रत्यक्ष नको, फोनवरच चर्चा करू- ट्रम्प

वॉशिंग्टन: संघर्षावर शांततापूर्ण तोडगा काढण्यासाठी अमेरिका आणि इराणचे अधिकारी फोनवरून एकमेकांशी संवाद साधू शकतात, असे प्रतिपादन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी केले. 'फॉक्स न्यूज चॅनेल'ला दिलेल्या एका मुलाखतीत ट्रम्प म्हणाले की, १७ तासांचा विमान प्रवास करून शिष्टमंडळ पाठवण्याऐवजी त्यांनी फोनवर चर्चेचा निर्णय घेतला आहे. "सर्व सूत्रे आमच्या हातात आहेत. जर त्यांना चर्चा करायची असेल, तर ते आमच्याकडे येऊ शकतात किंवा आम्हाला फोन करू शकतात," असे ट्रम्प यांनी म्हटले.

पोलिसांचा नकार! जरांगेंच्या मुंबई आंदोलनाला परवानगी नाही; द्वेषबुद्धीचा निर्णय, उपोषण होणारच - मनोज जरांगे

राज्यात हे काय चालले आहे?

आजचे राशिभविष्य, १४ सप्टेंबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

हरतालिका तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा! सौभाग्य, सुख-समृद्धीसाठी प्रियजनांना पाठवा खास शुभेच्छा संदेश अन् शेअर करा आकर्षक कार्ड्स

Ganesh Chaturthi 2026 : 'लाडक्या बाप्पाची स्वारी आली!' आप्तेष्टांना पाठवा प्रेम, आनंद आणि भक्तीने सजलेल्या मराठी शुभेच्छा अन् HD कार्ड्स