Video : नेपाळमध्ये बस दरीत कोसळून १४ ठार Photo - X
आंतरराष्ट्रीय

Video : नेपाळमध्ये बस दरीत कोसळून १४ ठार

छठपूजेसाठी गावी परतणाऱ्या प्रवाशांच्या मायक्रोबसला गुरुवारी नेपाळमध्ये भीषण अपघात झाला.

Swapnil S

काठमांडू : छठपूजेसाठी गावी परतणाऱ्या प्रवाशांच्या मायक्रोबसला गुरुवारी नेपाळमध्ये भीषण अपघात झाला. डोंगराळ रस्त्यावरून बस ३०० मीटर खोल दरीत कोसळून झालेल्या या अपघातात १४ जणांचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

हा अपघात गुरुवारी पहाटे ५.४५ च्या सुमारास बागमती प्रांतातील मकवानपूर जिल्ह्यात झाला. जिल्हा पोलीस कार्यालयाच्या माहिती अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही मायक्रोबस काठमांडू येथून सर्लाही जिल्ह्याकडे जात होती.

त्यावेळी भीमफेदी ग्रामीण नगरपालिकेतील भीमफेदी-कुलेखानी-काठमांडू रस्त्यावरील डोंगराळ भागात ती सुमारे ३०० मीटर खाली कोसळली. या भीषण अपघातात चालकासह १४ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

या अपघातातील सहा जखमी प्रवाशांना उपचारासाठी हेटौंडा नगरपालिकेतील स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. रविवारी येणाऱ्या छठ सणासाठी काठमांडूहून सर्लाही जिल्ह्यातील आपल्या घरी परतत असलेले रहिवासी या वाहनातून प्रवास करत होते.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

UPI वापरणाऱ्या दुकानदारांसाठी खूशखबर! NPCI ने आणली शानदार स्कीम, कसा होणार फायदा? वाचा सविस्तर

एम.एस्सी. नर्सिंग महाविद्यालय ठाण्यात; प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या परिसरात महाविद्यालयाला मान्यता

भाडेकरू फ्लॅट खाली करत नाहीये? आता मनमानी चालणार नाही; मुंबई पोलिसांकडून पहिल्यांदाच घराचा ताबा सोडण्याचे आदेश

Mumbai : नव्या सभागृहाचा मार्ग मोकळा! ३२९ नगरसेवकांसाठी प्रशस्त सभागृह उभारण्यास स्थायीची मंजुरी

ठाणे स्थानकातील सरकते जिने प्रवाशांसाठी गैरसोयीचे; १२ डब्यांच्या लोकलमधील प्रवाशांची फरफट, फलाट ५ आणि ६ वरील नियोजनावर प्रश्नचिन्ह