पाकिस्तानच्या नौदलात पहिले हेरगिरी जहाज ‘पीएनएस रिजवान’  Photo: X/@detresfa_
आंतरराष्ट्रीय

पाकिस्तानी नौदलात पहिल्यांदाच हेरगिरी जहाज; PNS Rizwan साठी चीनने केली मदत

पाकिस्तानने आपल्या ताफ्यात हेरगिरी जहाज सामील करून भारताच्या ‘आयएनएस ध्रुव’ला प्रत्युत्तर दिल्याची चर्चा...

Swapnil S

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या नौदलात पहिले हेरगिरी जहाज ‘पीएनएस रिजवान’ सामील झाले आहे. या जहाजासाठी पाकिस्तानला चीनने मोठी मदत केल्याचे उघड झाले आहे. या जहाजाची बांधणी चीनमध्ये करण्यात आली. विशेष म्हणजे, पाकिस्तानने या हेरगिरी जहाजाबाबत कोणतीही माहिती दिली नाही. पाकिस्तानने आपल्या ताफ्यात हेरगिरी जहाज सामील करून भारताच्या ‘आयएनएस ध्रुव’ला प्रत्युत्तर दिल्याची चर्चा आहे. पाकिस्तानच्या या हेरगिरी जहाजाकडे आण्विक आंतरखंडिय क्षेपणास्त्राचा माग काढण्याची व गुप्त माहिती गोळा करण्याची क्षमता आहे.

भारताच्या ‘आयएनएस ध्रुव’ची लांबी १७५ मीटर लांब असून त्यात दीर्घ क्षमतेचे रडार, आधुनिक यंत्रणा आहेत. पाकिस्तानचे ‘पीएनएस रिजवान’ हे ‘आयएनएस ध्रुव’च्या तुलनेत छोटे जहाज आहे. ‘आयएनएस ध्रुव’ हे २०२१ मध्ये भारतीय नौदलात सामील केले होते.

मोजक्याच देशांकडे हेरगिरी जहाजे

जगात हेरगिरी जहाजे काही मोजक्याच देशांकडे आहेत. त्यात अमेरिका, रशिया, फ्रान्स, चीन आणि भारताचा समावेश आहे. चीन आपले हेरगिरी जहाज हिंदी महासागरात उतरवतो. ते जहाज भारताच्या क्षेपणास्त्र डागण्याच्या क्षमतेवर नजर ठेवून असते. भारत व चीनमध्ये तणाव सुरू आहे. त्यामुळे भारताच्या प्रत्येक क्षेत्रातील माहिती चीनला हवी असते. भारतही चीनच्या प्रत्येक आगळिकीला प्रत्युत्तर देत असतो. श्रीलंका, मालदीव आदी देशांमुळे चीनला हिंदी महासागरात हेरगिरी जहाजे उतरवण्याची संधी मिळते. ‘आयएनएस ध्रुव’ची उभारणी विशाखापट्टणमच्या हिंदुस्तान शिपयार्डमध्ये झाली. हे जहाज नौदल, डीआरडीओ व एनटीआरओने बनवले आहे. भारताने स्वत: या जहाजाची उभारणी केली आहे.

पाकिस्तानच्या हेरगिरी जहाजाचे छायाचित्र ‘ओपन सोर्स’ हेरगिरी तज्ज्ञ डेमियन सायमन यांनी जाहीर केले. चीनच्या माध्यमातून हिंदी महासागरात आपले रणनीती सामर्थ्य वाढवण्याचे काम पाकिस्तान करत आहे. या जहाजाचा वापर पाकिस्तान वर्षभरापासून करत आहे. मात्र, आता औपचारिकपणे पाकिस्तानी नौदलाच्या ताफ्यात या जहाजाचा समावेश करण्यात आला आहे.

एकत्र आणणं माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं; राज ठाकरेंचा हल्लाबोल

''कुठचाही 'झेंडा' नाही, मराठी हाच 'अजेंडा'; माझ्या मराठीकडे-महाराष्ट्राकडे वेड्यावाकड्या नजरेने पाहायचं नाही,'' वाचा राज ठाकरे यांचं संपूर्ण भाषण

''जर इथे येऊन धंदा करताय तर मराठी बोलायची लाज कसली?'' अभिनेते भरत जाधव यांचा संतप्त सवाल

गुजरातेत हिंदी सक्ती नसेल, तर ती महाराष्ट्रात कशासाठी? खासदार सुप्रिया सुळे यांचा संतप्त सवाल

‘जय गुजरात’मुळे वादंग; अमित शहांपुढे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या घोषणेमुळे विरोधक संतप्त