आंतरराष्ट्रीय

Polina Menshikh:परफॉर्मन्स सुरु असताना भीषण स्फोट ; प्रसिद्ध अभिनेत्रीचा दुर्देवी मृत्यू

या हल्ल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करण्यात आला असून तो मोठ्या प्रमाणावर वायरल होत आहे.

नवशक्ती Web Desk

सध्या देशात अनेक ठिकाणी युद्ध सुरु आहेत. तसंच रशिया आणि युक्रेनमध्ये देखील भीषण युद्ध सुरु आहे. या युद्धामध्ये एका अभिनेत्रीला तिचा जीव गमवावा लागला असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. रशियन लष्करी सुट्टीच्या निमित्ताने कार्यक्रम सादर करणारी अभिनेत्री पोलिना मेनशिख हिचा युक्रेनियन हल्ल्यात दुर्देवी मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

रशियन-व्याप्त युक्रेनियन प्रदेशातील डान्स हॉलमध्ये 19 नोव्हेंबर रोजी रशियन लष्करी सुट्टी साजरी करण्यासाठी अभिनेत्री त्याठिकाणी एक कार्यक्रम करत होती. या वेळी अचानक एक स्फोट झाला आणि अभिनेत्री जखमी झाली. यानंतर तिचा रुग्णालयात उपचारादम्यान मृत्यू झाला.

'लाईव्ह हिंदुस्तान'ने दिलेल्या वृत्तानुसार, 19 नोव्हेंबर रोजी झालेल्या या हल्ल्यादरम्यान अभिनेत्री मेनशिख रशियन सैनिकांसाठी परफॉर्म करत होती. या हल्ल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करण्यात आला असून तो मोठ्या प्रमाणावर वायरल होत आहे. त्या व्हिडिओत अभिनेत्री स्टेजवर गाताना आणि गिटार वाजवताना दिसत आहे. त्याचवेळी स्फोट होतो आणि हॉलचे दिवे विझतात. या हल्ल्यात जखमी झालेल्या मेनशिखचा नंतर रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झाला आहे.

एसटीची 'ग्रुप ऑफर' हिट! गणेशोत्सवासाठी ३० टक्के अधिभार रद्द केल्याने कोकणासाठी ५,१८४ बसेस फुल्ल

समृद्धी महामार्ग होणार 'स्मार्ट'! AI कॅमेऱ्यांच्या उभारणीला सुरुवात; नागपूरपासून २५० किमीच्या टप्प्यांत काम

Mumbai : चर्चेविना २० हजार कोटींचे प्रस्ताव मंजूर; विरोधकांचा सभागृहातून सभात्याग; महापालिका सभागृहाबाहेर प्रतिसभागृह

पूर्व, पश्चिम द्रुतगती मार्गावर शौचालयांचा अभाव; नगरसेवकांचा सभागृहात प्रशासनावर हल्लाबोल

Mumbai : कोस्टल रोडच्या बोगद्यात भीषण अपघात; कार-टॅक्सीची जोरदार धडक